You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

अरिहंत विद्यामंदीर म.प्राथ.शाळा शिरपूर येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त भव्य रॕलीचे आयोजन

शिरपूर जैन- अरिहंत विद्यामंदिर म.प्राथ शाळा शिरपूर जैन येथे राष्ट्रमाता मॉ जिजाऊसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त दि १३/०१/२०२०  रोज सोमवारला भव्य रॕलीचे आयोजन करण्यात आले.या रॕलीचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष मा. संदीप भुरे व संस्थेच्या उपाध्यक्षा सरस्वती बांदे  यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन आणि फित कापून करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्याने रॕली काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथसंचलन ,भाषणे,गणितीय उखाणे इ.उपक्रम सादर करून समस्त शिरपूर नगरिय नागरिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी  ठिकठिकाणी रॕली रथाचे स्वागत करून  विद्यार्थ्यांना चॉकलेट व खाऊचे वाटप  करण्यात आले.  यामध्ये पत्रकार गोपाल वाढे सर,गजानन  देशमुख ,वाशिम जिल्हा शिवसेना उपप्रमुख अशोक अंभोरे ,मुंकुंद चोपडे, प्रतापराव देशमुख,राजेश्वरराव देशमुख सुवर्णाताई देशमुख ,सचिन जाधव,प्रविण कदम, नरेंद्र मनाटकर राहूल मनाटकर आदी गावातील मान्यवरांच्या वतीने रलीचे स्वागत व खाऊचे वाटप केले. रॕलीच्या यशस्वीतेसाठी मु.अ.किशोर जाधव यांच्यासह सोनाली पंचवाटकर, दिप्ती कान्हेड, आश्विनी देशमुख, रूपाली दायमा, लता कोकीळवार, नंदा वाघ, दिलीप तागड, बंडू चोपडे, तेजस बांदे, राहूल बोबडे, संदीप सोमटकर, विकास देशमुख आदी शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close