You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

पुंडलीकराव गवळी महाविद्यालयात कौशल्यविकास कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न

शिरपूर जैन येथील पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती चे माननीय कुलगुरू डॉ. मुरलीधरजी चांदेकर यांच्या या संकल्पनेतून संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. के. पोकळे यांच्या मार्गदर्शनात दि. 14 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रथम दिवशी कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ थाटात संपन्न झाला. सर्वप्रथम वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. के. पोकळे हे अध्यक्ष म्हणून तर श्री गुलाब नबी आजाद समाजकार्य महाविद्यालय पुसदचे सहयोगी प्राध्यापक डॉ. भालचंद्र देशमुख हे उद्घाटक तथा प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. सचिन तायडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश तथा आवश्यकता इत्यादींचे कथन केले.
सदर कार्यशाळेमध्ये बीए व बीएस्सी तृतीय वर्षाचे एकूण चाळीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेमध्ये मोटिवेशन, गोल सेटिंग, प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन, रिझ्यूम रायटिंग, वर्बल कम्युनिकेशन, नाॅन वर्बल कमुनिकेशन, टाईम मॅनेजमेंट, इंटरव्यू स्किल व कॅरेक्टर, एथिक्स अँड मॉरल या दहा सत्रांचा समावेश असेल. या कार्यशाळेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रशिक्षक प्रा. डाॅ. भालचंद्र देशमुख, प्रा.डॉ. पद्मानंद तायडे डॉ. संजय देव्हडे व डॉ. सचिन गवई हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसदचे प्रा. डॉ. भालचंद्र देशमुख यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन व रिझ्युम रायटिंग या कौशल्यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू. के. पोकळे सर यांनी या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात, नोकरी व्यवसायात या कौशल्यांचा कसा उपयोग होईल हे पटवून दिले. कार्यशाळेला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अपूर्व गुप्ता, कार्यशाळेच्या आयोजन समितीचे सदस्य प्रा. संतोष गायकवाड हे मंचावर उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाचे संचालन कु. शुभांगी गुडदे व कु. शुभांगी मारवाडी, अतिथींचा परिचय योगेश लादे याने तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विशाल भिसे, ग्रंथपाल कल्पना मुरादे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close