You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

वाघी येथील रासेयो शिबिरात पाण्याचे महत्व व कौटुंबिक हिंसाचार या विषयावर व्याख्यान

दिलीप शिंदे

प्रतिनिधी/ऍक्टिव्ह न्यूज खंडाळा

दि 15 जानेवारी 2020

स्व पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो पथकाचे विशेष शिबिराला वाशिम पाटबंधारे विभागाचे तालुका जलदुत प्रविण पट्टेबहादूर यांनी पाण्याचा ताळेबंद काळाची गरज या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी महत्त्व व त्याचा योग्य वापर करण्याचे व वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्र, वाशिम जिल्हा समुपदेशक प्रभू कांबळे यांनी कौटुंबिक हिंसाचार, त्यांची कारणे, दुष्परिणाम व उपाययोजना सुचविल्या. माजी सरपंच पुंजाजी वाघ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रा रवि खडसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा श्रीकांत जहेरव यांनी केले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा व्ही एन लोहिया यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा श्रीकांत कलाने, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा डाॅ एस के लांडे, ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल धनवडे व बबिता चांगाडे यांनी केले तर रोषनी जहिरव हिने सर्वांचे आभार मानले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close