You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

वाघी येथील रा.से.यो.शिबिरात पत्रकार बांधवांचा सत्कार

दिलीप शिंदे

प्रतिनिधी

ऍक्टिव्ह न्यूज टीम शिरपूर/खंडाळा

स्व. पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रा.से.यो. पथकाद्वारे वाघी येथील विशेष निवासी शिबिरामध्ये लोकशाहीच्या चवथ्या आधार स्तंभ मानल्या जाणाऱ्या व लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी   मराठी पत्रकार परिषदेचे  असलम पठाण (अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद शिरपूर), गोपाल वाढे (सचिव मराठी पत्रकार परिषद शिरपूर), शेख सुलतान (उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद शिरपूर) संदीप गावडे, बाळा साखरे, गजानन देशमुख, तुषार मांडे, दिलीप शिंदे, नागेश बळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विष्णू गणपत वाघ अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एन. लोहिया यांनी केले. यावेळी त्यांनी लोकशाही मध्ये पत्रकारांची भूमिका स्पष्ट केली. सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार व कौतुक केले. यावेळी मराठी पत्रकार परिषद शिरपूर अध्यक्ष असलम पठाण व एक्टिव्ह न्यूजचे मुख्यसंपादक तथा मराठी पत्रकार परिषद शिरपूरचे सचिव गोपाल वाढे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. प्रा. श्रीकांत जहेरव यांनी सर्व मराठी पत्रकार परिषद च्या अमूल्य कार्याचा आढावा दिला. कार्यक्रमाला रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत कलाने, प्रा. डॉ. स्मिता लांडे, दत्तराव कव्हर, ग्रामस्थ व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा बळी व रिताली चव्हाण यांनी केले तर अश्विनी नवघरे हिने सर्वांचे आभार मानले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close