You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत वि.पो.अधिकारी यांच्या विशेष पथकाची कारवाई

शिरपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह !

शिरपूर दि.१४ जानेवारी २०२०

असरानी

          गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी वाशीम यांच्या विशेष पथकाने कारवाई करीत अवैध्य दारू विक्रेत्याला पकडून त्याच्या कडून ८५२८ रुपयांची दारू जप्त केली असल्याने शिरपूर पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरु असलेल्या अवैद्यधंद्या बाबत असलेल्या चर्चेला सदर कारवाईने महत्व प्राप्त झाले असून पोलीस प्रसानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दाखल घेणे क्रमप्राप्त आहे.

          प्राप्त माहिती नुसार सविस्तर असे कि, सरकारतर्फे  फिर्यादी संतोष पाईकराव वय ४१ वर्ष यांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली कि, संतोष खंडुजी पाइकराव, पोका अभिजीत बांगर, गजानन ब्राम्हण हे सहा. पोलीस अधिक्षक, सा.उप वि.पो.अधि.कार्या. वाशिम यांचे आदेशाने पेट्रोलिंग करित असतांना करंजी ते तामसी रोडवर कोंडु चिंतामण लहाणे यांचे शेतावळ रोडचे बाजुला एक इसम अवैद्य देशी दारू विक्री असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस स्टेशन शिरपुर येथुन पोहेका हिरासिंग जाधव यांना बोलावून दिनांक ०५/०१/२०२० रोजी १२.३० वाजताच्या सुमारास कोंडु चिंतामण लहाणे याचे शेजावळ रोडचे बाजुला भुजंग श्रीराम लहाणे वय ४० वर्ष रा.करंजी या इसमाची जवळून एकुण १६४ कार्टर प्रत्येकी १८० मिली देशी दारू संत्रा भिंगरी दारू किंमत ८५२८ रु. जप्त केली असून कलम ६५ इ मु. प्रो . अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close