You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

वाघी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराची सुरुवात

Story Highlights

  • विशेष उपक्रम म्हणजे वाघी बु.येथील रहिवासी अंकुश शंकर बहिरे या युवकाचे विज पडून अकस्मात निधन झाले होते त्याच्या कुटुंबास स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील कर्मचारी वृंदाकडुन आर्थिक मदत म्हणून ११५००/- रुपये निधी प्राचार्यांच्या हस्ते शंकर बहिरे यांना प्रदान करण्यात आले.

दिलीप शिंदे

ऍक्टिव्ह न्यूज खंडाळा

शिरपूर जैन येथील स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो. शिबिराचे दत्तक ग्राम वाघी येथे दि. १३ जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. के. पोकळे अध्यक्ष म्हणून तर वाघी बु. सरपंच सागरबाई महादेव पवार उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शारीरिक शिक्षण संचालक डॉ. एस डब्ल्यू खाडे, जि.प. प्राथमिक वरिष्ठ शाळेचे मुख्याध्यापक संजीव पवार, प्रा. श्रीकांत जहेरव, उपसरपंच दत्तराव कव्हर, शंकर बहिरे, विश्वंभर बहिरे, सुदाम वाघ, महादेव पवार, दत्तराव वाघ, शिवाजी बहिरे, हरिभाऊ कव्हर व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिराचे प्रास्ताविक प्रा. श्रीकांत कलाने यांनी केले तर शिबिरा दरम्यान होऊ घातलेल्या प्रस्तावित उपक्रमांची सविस्तर रुपरेषा रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एन. लोहिया यांनी मांडली. संजिव पवार यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

विशेष उपक्रम म्हणजे वाघी बु.येथील रहिवासी अंकुश शंकर बहिरे या युवकाचे विज पडून अकस्मात निधन झाले होते त्याच्या कुटुंबास स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील कर्मचारी वृंदाकडुन आर्थिक मदत म्हणून ११५००/-  रुपये निधी प्राचार्यांच्या हस्ते शंकर बहिरे यांना प्रदान करण्यात आले. प्राचार्य डॉ. पोकळे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. एस. के. लांडे, प्रा. श्रीकांत जहेरव व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close