You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिरपूर येथे शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान संपन्न

जि. प., प. स. निवडणूक; एकूण ७२.१९%मतदान

शिरपूर येथे  सकाळपासूनच ढगाळ व थंडीच्या वातावरणातही मतदारांनि मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या,मतदान  शांततापूर्ण वातावरणामध्ये  संपन्न झाले.

  एकूण १३४८९ मतदारांपैकी  ९७३८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकूण ७२.१९  % एवढे मतदान झाले एकूण १४ बुथवर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला, सकाळीच मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगाच्या रांगा दिसत होत्या, यावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. निवडणुकीदरम्यान प्रशासनाच्यावतीने  बूथ लेवल ऑफिसर ( BLO) मार्फत मतदारांच्या मतदार यादीच्या मतदार चिठ्ठी निवडणुकीच्या दिनांका पूर्वीच मतदारांना वाटप करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करणे गरजेचे  होते, परंतु महसूल विभागाकडून मतदार याद्या अपडेट न झाल्यामुळे  मतदारांची वेळेवर तारांबळ उडाली होती.व अनेक मतदार मतदानापासून वंचीत राहल्याचे प्रकार समोर आले। आहेत. एकूणच मतदान शांततेत पार पडले दरम्यान पोलिस उपनिरीक्षक चंदन वानखेडे व प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त  ठेवण्यात आला होता.

      निवडणुकीदरम्यान प्रशासनाकडून मतदारांच्या मतदार यादीच्या चिठ्ठ्या मतदारांना निवडणुकीच्या दिनांक पूर्वीच ( BLO) मार्फत मतदारांना घरपोच वाटप करणे गरजेचे असतांना महसूल विभागाकडून मतदार याद्या त्या त्या प.स.गणानुसार वेग वेगळ्या करून अपडेट करणे गरजेचे होते. परंतु मालेगांव महसूल प्रशासनाकडून मतदार  याद्या अपडेट करण्याचे काम वेळेवर पूर्ण झाले नाही. निवडणूक अधिकारी व तहसीलदार मालेगांव यांना सदर बाबी बद्दल विचारणा केली असता, तांत्रिक कारणामुळे शिरपूर सर्कलच्या याद्या अपडेट करता आल्या नाहीत. असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र मतदारांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. बरेच मतदारांचे नांव यादीमध्ये समाविष्ठ नसल्यामुळे आणि अनेकांचे अनुक्रमांक जुळत नसल्याने मतदारांना या मतदार केंद्रा वरून त्या मतदार केंद्रावर हेलपाटे मारावे लागले. त्यामुळे मतदानाचा टक्का सुद्धा घसरला अन्यथा ७५ ते ८० टक्के पर्यंत मतदानाचा टक्का वाढू शकला असता.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close