You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

जि.प.शिरपूर सर्कल कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.शाम गाभणे यांची प्रचंड प्रचार रॅली

सर्वधर्मीय युवक आणि कार्यकर्ते प्रचार फेरींमध्ये स्वयंस्फुर्तीने डॉ.शाम गाभणे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करतांना

शिरपूर दि.०५/०१/२०२०

   जि.प.निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीचा आज शेवटचा दिवस असल्याने ५ वाजता प्रचार तोफा थंडावल्या असून प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेण्यावर सर्वच उमेदवार भर देत आहेत. उच्च विध्याविभूषित, प्रशासकीय कामाचा प्रचंड अनुभव असलेले,निष्कलंक, माजी आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.शाम लिंबाजी गाभणे हे  शिरपूर जि.प.सर्कल मधून कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. दिनांक ०१ जानेवारी पासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रतिस्पर्धी उमेदवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचार करून वातावरण निर्मिती केली परंतु मागील २ दिवसांपासून कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या जोशात प्रचार करीत असून कामाला लागल्याने त्याचे फळ सुद्धा त्यांना मिळणार आहे.अशी चर्चा शिरपूर येथील मतदार करीत आहेत.

जाहिरात

त्यातच प्रतिस्पर्धी उमेदवाराने घेतलेल्या माजी मुख्यमंत्र्याच्या प्रचार सभेने परिस्थिती पालटली, असून  विशिष्ठ समाज त्यांच्या पासून दुरावला जावून एकजुटीने कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र आज मतदारसंघात निर्माण झाले आहे. फार मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय युवक आणि कार्यकर्ते प्रचार फेरींमध्ये स्वयंस्फुर्तीने डॉ.शाम गाभणे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करतांना दिसून येत आहे. लांबच लांब फेऱ्या निघत असून हजारो युवक, नागरिक या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्याने सर्वत्र कॉंग्रेसमय वातावरण दिसून येत असल्याने ३ दिवसांपूर्वी असलेली परिस्थिती आज बदलेली आपणास बघावयास मिळत आहे. अनेक छोट्या समाजातून मतदारांचा जाहीर पाठींबा मिळत असून डॉ. शाम गाभणे हेच निवडणुकीत बाजी मारणार असल्याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे

जाहिरात
Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close