You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिरपूर जैन येथे शिवसेनेची प्रचारात आघाडी

विजयचा होणार विजय ! सर्वत्र चर्चा

शिरपूर दि.०५/०१/२०२०

जाहिरात 👇

      शिरपूर जैन येथे जि.प.व पं.स.च्या प्रचाराच्या रणधुमाळीचा आज शेवटचा दिवस असून आज ५ वाजता प्रचार तोफा थंडावणार आहेत. शिरपूर जैन येथील शिवसेना जि.प.चे उमेदवार विजय निवृत्ती अंभोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सर्वच जनसमुदायामधून व समाजामधून पाठींबा वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. शिरपूर येथील शिवसेनेचे जि.प.अधिकृत उमेदवार विजय अंभोरे व पंचायत समिती शिरपूर १  व २ चे अनुक्रमे गणेश बोबडे व जयश्री प्रभाकर पुंड यांना  प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलं असल्याचे निदर्शनास येत आहे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून सर्वच मतदारांच्या व्यक्तिश: भेटी घेवून मतदान करून आम्हाला सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन करण्यात येत आहे. अलीकडेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाले असून शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला आहे तसेच शिवसेनेचे संजय राठोड यांच्या रूपाने पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाले आहेत तसेच अशोक अंभोरे यांचेकडे शिवसेना उप जिल्हाप्रमुख पद असल्याने शिरपुरच्या सर्वांगीण विकासासाठी ते मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणू शकतात त्यामुळे साहजिकच शिरपुरच्या विकासाची दारे उघडण्याची संभावना जाणकारांच्या मते वर्तविली जात आहे. क्रांती पनेलच्या माध्यमातून त्यांनी आज पर्यंत ग्रा.प.माध्यमातून अनेक विकास कामे करून हे सिद्ध करून दाखवले आहे.

 एकूणच शिवसेनेच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असून शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावातच विजय असल्याने विजय अंभोरे यांचा विजय नक्कीच होणार अशी जनमाणसांमध्ये चर्चा दिसून येत असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आणखी उल्हासाने कामाला लागले त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळणार आहे.

जाहिरात 👇👇👇

👇👇

जाहिरात 👇
जाहिरात
Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close