You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

माजी मुख्यमंत्र्याची शिरपूर येथे प्रचार सभा संपन्न

फडणविसांच्या सभेचा परिणाम उलटा होणार? उपस्थितांमध्ये चर्चा!

प्रतिनिधी दि.०४/०१/२०२०

      शिरपूर जैन येथे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची जि.प.उमेदवाराची प्रचार सभा दिनांक ०४/०१/२०२० रोजी संपन्न झाली. सदर प्रचार सभे मध्ये फडणवीस यांनी महाआघाडीच्या सरकावर टीका करीत विश्वासघातकी सरकार असल्याचा उल्लेख केला. शिवसेनेने भाजपाच्या मतांवर निवडून येवून कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जवळीक साधून सरकार स्थापन केले व  मतदारांचा जनमताचा विश्वासघात अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली. १० रुपयात शिवभोजन आणि नव्याने जाहीर झालेली कर्जमाफी योजना फसवी आहे असे ते पुढे बोलतांनी म्हणाले.

तत्पूर्वी आपल्या पक्षाचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या व विधान सभेच्या निवडणुकीत युतीच्या नाही तर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचे काम करा असे पक्षाच्या लोकांना आदेश दिल्याची चर्चा असलेल्या माजी आमदार यांनी सभेला संबोधित केले व आपल्या पक्षाच्या काळात वाशीम जिल्ह्यात कशी विकास कामे झाली ते सांगितले.

११ वाजता सुरु होणारया नियोजित सभेला दुपारी २ वाजता फडणवीस यांनी संबोधित केले. सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला परंतु सभा संपल्यानंतर उपस्थित जनतेमध्ये प्रचंड रोष दिसून आला. जमलेली गर्दी कितपत मतदानात बदलते हे पाहणे औचित्याचे  ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या काही निर्णयांवर समाजातील काही घटक,अल्पसंख्यांक समाज आधीपासूनच नाराज असल्याने फडणविसांना प्रचार सभेला आणून “आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला”? अशी उपस्थितांमध्ये चर्चा दिसून आली. या सभेमुळे मुस्लीम समाजाची मते भाजपला मिळणार काय? अशी सुद्धा चर्चा ऐकावयास मिळाली.

या सभेला माजी गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, भाजपा वाशीम जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटणी, मालेगांव तालुका अध्यक्ष तानाजी पाटील तथा वाशीम जिल्हातील अनेक भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते तर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

सभेच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक उपस्थितांना, अतिथींना कार्यकर्त्यांना, पत्रकारांना उभे राहावे लागले हे विशेष.

👇👇👇👇

👇👇👇👇

👇👇👇👇

जाहिरात 👇👇👇👇

जाहिरात
Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close