You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिरपुर जि.प. सर्कलमध्ये शिवसेना- भाजपात काट्याची टक्कर ?

प्रस्थापितांना शिवसेनेचे कडवे आव्हान

रणसंग्राम मिनी मंत्रालयाचा……

शिरपूर दि ०१/०१/२०२०

जाहिरात

होऊ घातलेल्या जि. प. व प. स. निवडणुकीमध्ये शिरपूर सर्कल  जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या सर्कलमध्ये शिवसेना व् भाजपात काट्याची टक्कर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रस्थापितांना या निवडणुकीमध्ये कडवे आव्हान निर्माण होणार हे निश्चित मानले जात आहे.

      दिनांक ३० डिसेंबर रोजी शिरपूर जि.प सर्कल मध्ये एकूण ५ उमेदवारांपैकी एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे आता शिवसेना, भाजप व कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि एक अपक्ष असे चारच उमेदवार या रन संग्रामाच्या रिंगणात उतरले आहेत.

शिवसेनेच्या वतीने जि.प. सर्कल करिता तरुण तडफदार असलेले विजय निवृत्ती अंभोरे हे अधिकृत उमेदवार आहेत. तर भाजपच्या तर्फे मागील १० वर्षापासून निवडून आलेले मोहम्मद इमदाद व मागील २ निवडणुकीत क्रमांक दोन वर असलेले डॉ.शाम गाभणे हे काँग्रेस/राष्ट्रवादी कडून तर नवखे असलेले अपक्ष उमेदवार बाबू इमाम परसुवाले असे चार उमेदवार जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामध्ये परस्पराविरुद्ध उभे ठाकले आहेत.

या निवडणुकीमध्ये खरी लढत ही शिवसेना व भाजपातच होत असल्याची चर्चा मतदारांमध्ये दिसून येत आहे. शिरपूर सर्कलमध्ये एकूण १३ हजार ५५३ मतदार आहेत. त्यापैकी कोणते मतदार कोणत्या पक्षाकडे आकर्षित होतात, हे सुद्धा महत्वाचे असणार आहे .शिवसेनेची हिंदुत्ववादी  भूमिका असल्याने हिंदूंच्या मताचे ध्रुविकरन होऊन त्याचा फायदा शिवसेनेला मिळू शकतो. तसेच मागील तीन वर्षांपासून शिरपूर ग्राम पंचायतच्या माध्यमातून शहरात केलेली अनेक  विकासकामे ही शिवसेच्या उमेदवाराची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा फायदा या निवडणुकीत होणार असल्याचे जाणकारांच्या वतीने बोले जात आहे. एकूणच या निवडणुकीमध्ये प्रस्थापित उमेदवारास कडवे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप काट्याची टक्कर होणार असल्याचे सुज्ञ मतदारकडून व्यक्त होत आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close