You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

युवकाची गळफास लावून आत्महत्या

रिसोड , शहरातील वाशिम मार्गावर असलेल्या शिवगर्जना अकादमी संचालक असलेल्या युवकाने अकादमी वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ३० नोव्हंेबर रोजी दुपारी घडली असून राहूूल किसन भुतेकर (३२) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील वाशिम मार्गावर शिवगर्जना अकादमी असून या शिकवणीवर्गाचे संचालक राहूल भुतेकर यांनी शनिवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. याआधी राहूल भुतेकर यांनी शिकवणीवर्ग कार्यालयाच्या खोलीतील फळ्यावर लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस कुणीही दोषी नसून कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे नमूद केले.त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत माहिती मिळू शकली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी हलविला.त्यांच्या पश्चात पत्नी, वर्षांचा चिमुकला मुलगा, आईवडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे. वविध भरती प्रक्रियेसाठी युवकांना प्रोत्साहित करुन प्रशिक्षित करण्यासोबत विविध समाजकार्यामुळे राहूल चर्चेत राहत असे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close