You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिरपूर दि.३० नोव्हेंबर (प्रतिनिधी)

बहुजन नायक, थोर समाज सुधारक, क्रांतिसूर्य, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल त्यांच्या स्मृती दिनी फेसबूक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी शुभम पाटील निकम या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी दिनांक २८ रोजी शिरपूर जैन येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले.

शुभम निकम पाटील या तरुणाने दिनांक २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून लिखाण केले व पोस्ट केले. सदर प्रकार अत्यंत संतापजनक असून संपूर्ण महाराष्ट्रभर या समाजकंटकांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. शिरपूर येथील बहुजन समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी २८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता ठाणेदारांना निवेदन देऊन पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित गुन्हा दाखल करावा. ही मागणी केली गुन्हा दाखल न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदनावर गणेश भालेराव, संतोष बाविस्कर, कपिल भालेराव, शैलेश जगताप, अश्विन बाविस्कर, महादेव भालेराव, सुरेश गाभणे, लखन राजगुरू, गोविंद भालेराव, रामा बोराटे, ऋषिकेश वाघमारे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close