You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

दोन दिवसांचे पुरुष जातीचे जीवंत अर्भक आढळले

मालेगाव शहरात एकच खळबळ : अकोला फाट्यावरची घटना

Story Highlights

  • मालेगाव अकोला फाटा येथे आज 28 नोव्हेंबरला सायंकाळी 7:30 वा चे सुमारास अनिल बाविस्कर यांना मालेगाव अकोला रोडवर नादुरुस्त लक्सरी खाली लहान बाळ रडण्याचा आवाज आला...त्यानि जवळ जाऊन पाहिले तर छोटे बाळ बेवारस स्थितीत दिसले त्यांनी पोलिसांना फोन करून हकीकत सांगितली लगेच हेड कॉन्स्टेबल बियाणी, काळे, झगरे असे घटना स्थळी धावलो व अर्भक ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ...बाळ थंडीने कुडकुडत होते त्याला उबदार कपडे, आणले Dr नि लिहून दिलेले दूध पावडर नेपल आणून दिले बाळ 2.500 की ग्राम आहे चांगले आहे बाळाला बेवारस सोडून देणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भादवी कलम 317 अन्वये गुन्हा दखल केले

मालेगाव ,

_______________

मालेगांव शहरातील अकोला फाट्यावर दोन दिवसांचे पुरुष जातीचे जीवंत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, अकोला फाट्यावरील रस्त्यालगत अनेक वर्षांपासून बंद असलेल्या खासगी बस खाली दोन दिवसांचे पुरुष जातीचे जीवंत अर्भक अज्ञाताने टाकून निघून गेले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी विजय बळी व अनिल बाविस्कर यांना बस खाली बाळ रडत असल्याचे लक्षात आले.त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता बसखालील झाडाझूडपात बाळ दिसून आले. सदर प्रकारची माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बाळाला मालेगाव ग्रामीण रुग्णालयात नेवून वैद्यकीय तपासणी केली असता बाळाची प्रकृती उत्तम होती.दरम्यान, या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा रंगू लागल्या असून तर्क वितरकांना उधान आले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास हाती घेतला आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close