ब्रेकिंग

अॅड रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयात डॉ. एस. आर रंगनाथन जयंती उत्साहात साजरी

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

वाशीम :- अॅड. रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयामध्ये दिनांक 12 ऑगस्ट रोजी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्य कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश दाभाडे, हे अध्यक्षस्थानी होते. पुस्तके हे आपले गुरु असुन पुस्तकरुपी अमुल्य ठेवा हा ज्या ठिकाणी सुरक्षीत असतो ते ग्रंथालय आपल्या जीवनातील ज्ञानाची तिजोरी असुन जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. सुशांत चिमणे हे होते, त्यांनी मार्गदर्शन करतांना नमुद केले की, ग्रंथालय म्हणजे बुक बँक असुन या अमुल्य अशा पुस्तकरुपी धनाचा लाभ हा विद्यार्थ्यांनी किंबहुना सर्वांनीच घ्यायला हवा तसेच ग्रंथालयाचा उपयोग करण्याचे विद्यार्थ्यांना आवर्जुन आवाहनही केले.

या प्रसंगी नविन उपक्रम राबवत असतांना ग्रंथालय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे ग्रंथपाल प्रा. संजय इढोळे, अधिक्षक महादेव सोमाणी, राहुल पांडे, जितेश अग्रवाल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन यथोचीत आदर सत्कार करण्यात आला. सोबतच उत्कृष्ट वाचक म्हणुन गजानन महाले याची पुरस्कारा करीता निवड झाली. फिजाखान, प्रशांत भगत, रमेश गरपाल, मानकर यांनी डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनचरित्राचे सुंदर भाषणरुपी पुष्प गुंफले.

तसेच ग्रंथपाल प्रा. संजय इढोळे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती प्रसंगी ग्रंथालयातील सेवेची तसेच डॉ एस. आर. रंगनाथन यांचे पाच सुत्राची माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वरी काकड यांनी केले तर आभार प्रदर्शन आदर्श दामोदर यांनी केले. या प्रसंगी प्रा. ललिता दाभाडे, डॉ. सागर सोनी, भाग्यश्री धुमाळे, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संपुर्ण विधी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहुन कार्यक्रम यशस्वीतेने संपन्न झाला.

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे