कराड येथील पत्रकार संमेलनात अकोट येथील देशोन्नतीचे उपसंपादक नीलेश पोटे यांना राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्रधान

निलेश बहाड अकोट प्रतिनिधी
दिनांक 26, 11, 2019
चौदावे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन कराड येथे 24 व 25 नोव्हेंबर 2019 रोजी संपन्न झाले. या संमेलनात राज्यभरातून हजारोच्या वर पत्रकार गोळा झाले होते यात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शील देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोट येथील देशोन्नतीचे उपसंपादक श्री निलेश भाऊ शिवचंद्र पोटे यांना राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार 14 व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात 24 व 25 नोव्हेंबर रोजी कराड येथे झालेल्या संमेलनात त्यांना हा मानाचा पत्रकार प्रेरणा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या संमेलनात महाराष्ट्र राज्यातून हजारो पत्रकार कराड येथील संमेलनात उपस्थित होते त्यात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अश्या तसेच आपल्या लेखणीच्या भरोशावर माणसाच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या पत्रकारांना विशेष पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. निलेश भाऊ पोटे यांना राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेवर जिल्ह्यातून कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निलेश भाऊ पोटे यांना पुरस्कार अजिंक्य भाऊ गोवेकर यासीन भाई पटेल सतीश भाऊ कदम शेखर भाऊ चरेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे देण्यात आला. कराड येथे राज्यस्तरीय चौदावे पत्रकार संमेलन संपन्न झाले या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी आपली यथोचित मेहनत खर्च केली या सर्व टीमचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो.