You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

सिलेंडरची होम डिलिव्हरी मोफत देणे बंधनकारकच !

नकार दिल्यास तुम्ही करू शकता तक्रार...

Story Highlights

  • पैसे देण्यास नकार दिल्यास आपण करू शकता तक्रार कोणताही एजन्सी संचालक ही रक्कम देण्यासाठी आपणास नकार देऊ शकत नाही. तसे केल्यास तुम्ही १८००२३३३५५५ या नंबरवर कॉल करू शकता. आता ग्राहकांना सबसिडीचे १२ सिलेंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर नागरिकांना मार्केट दरात सिलिंडर खरेदी करावा लागतो.

स्वतः सिलेंडर घेऊन आल्यावर एजन्सी देणार ग्राहकाला पैसे

पूर्वीच्या काळी एक म्हण होती ‘घरोघरीमातीच्या चुली’, परंतु आजच्या काळात गॅस सिलेंडरचा वापर दररोज प्रत्येक घरात केला जातो. तसेच प्रदूषण थांबवण्याच्या उद्देशाने सरकार उज्वल योजनेत सर्वांना चूलीचा वापर न करता गॅस सिलेंडरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र जास्त करून लोक जे सिलेंडरचा वापर करतात त्यांना हे नियम देखील माहिती नाहीत.
जर एखादी गॅस एजन्सी तुम्हाला सिलेंडरची होम डिलिव्हरी देत नसेल तर तुम्ही सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर एजन्सीकडून तुम्हाला एक रक्कम दिली जाते. आणि यासाठी तुम्हाला कोणताही एजन्सीवाला नाही बोलणार नाही. 

असा आहे नियम?

जर आपणाकडे कोणत्याही एजन्सीचे (किंवा कंपनीचे) कनेक्शन असेल तर तुम्ही त्याच्या गोडाऊनमधून स्वतः सिलेंडर आणू शकता. हे केल्यावर तुम्ही एजन्सीकडून १९ रुपये ५० पैसे परत आणू शकता. तो आपला हक्क आहे. आणि कोणतीही एजन्सी ही रक्कम देण्यासाठी आपणास मनाई करू शकत नाही. ही रक्कम दरवेळी डिलिवरी चार्ज म्हणून बिलात तुमच्याकडून आकारली जाते. सगळ्या एजन्सीची ही रक्कम ठरलेली आहे. काही दिवसांपूर्वीच ही रक्कम बदलण्यात आली आहे. या पूर्वी ही रक्कम १५ रुपये होती. आणि आता ती १९ रुपये ५० पैसे दिले जात नाही. 

पैसे देण्यास नकार दिल्यास आपण करू शकता तक्रार

कोणताही एजन्सी संचालक ही रक्कम देण्यासाठी आपणास नकार देऊ शकत नाही. तसे केल्यास तुम्ही १८००२३३३५५५ या नंबरवर कॉल करू शकता. आता ग्राहकांना सबसिडीचे १२ सिलेंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर नागरिकांना मार्केट दरात सिलिंडर खरेदी करावा लागतो. 

रेग्युलेटर होतो फ्रीमध्ये चेंज !

जर तुमचे सिलेंडरचे रेग्युलेटर लिक असेल तर तुम्ही एजन्सीकडून ते फ्रीमध्ये बदलू शकता.यासाठी तुम्हाला कुठलीही रक्कम देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुमच्याकडे एजन्सीचे सब्सिक्रिप्शन वाऊचर असणं गरजेचं आहे. आधीचे लीक रेग्युलेटर स्वतःसोबत घेऊन जावे लागेल. त्यानंतर सब्सक्रिप्शन वाऊचर आणि रेग्युलेटरचा नंबर चेक केला जातो. दोन्ही नंबर मॅच झाल्यावर ग्राहकाला फ्री मध्येच रेग्युलेटर बदलून दिला जातो.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close