You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

महावितरण कंपनीचा भोंगळा कारभार

बिगारी काम करत असताना विजेच्या शॉकने तरुण महेंद्र (उर्फ) संभाजी शिवाजी आव्हाड याचा जागीच मृत्यू

वाळूज औद्योगिक वसाहत मधील रांजणगाव शे.पुं.येथे विजेच्या शॉकने युवकाचा मृत्यू दि. १५ नोव्हेंबर रोजी ठीक १०.३० वा.वार्ड नंबर १ शिवनेरी कॉलनी येथे घडली या दुखद घटनेने रांजणगाव शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बिगारी काम करत असताना विजेच्या शॉकने तरुण महेंद्र (उर्फ) संभाजी शिवाजी आव्हाड याचा जागीच मृत्यू झाला आहे त्याप्रसंगी मुंदडा सेठ यांनी ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे यांना फोन करून बोलावून घेतले ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे यांनी कुठलाही विलंब न करता पोलीस स्टेशनला कळवून ही माहिती दिली पोलिस प्रशासनाने वेळेवर प्राचारण करून मुतदेह काढण्यासाठी अग्निशमन पथकास बोलावून मोठ्या कसरती नंतर मृतदेह काढण्यात आला त्यावेळेस रांजणगाव शे.पू ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे यांनी महावितरण ऑफिसला संपर्क केला असता ऑफिसमधून फोन कोणीच उचलला नाही असे सूत्राकडून कळाले.
शेवटची बातमी हाती आली तेव्हा एम.आय.डि.सी पोलीस स्टेशनला मृताची आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.रांजणगाव शे.पुं. ग्रामपंचायतीने वारंवार उच्च दाब विद्युत लाईन वसतिगृहातून काढण्यासाठी पाठपुरावा केला असून त्या कडे महावितरण ने दुर्लक्ष केले आजपर्यंत हा रांजणगावातील विजेचा शॉक लागून चौथा बळी ठरला असून या मुता च्या परिवारास आर्थिक नुकसान भरपाई महावितरणने द्यावी व यानंतर अशी कुठली घटना घडल्यास महावितरणच जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला तसेच वेळेत उच्च दाब विद्युत चे पोल महावितरण ने काढले नाही तर रांजणगाव शें.पु. शहरवासीयांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा महावितरणला यावेळी देण्यात आला.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close