You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

पै . बाळासाहेब माणिकराव देशमुख (भाऊ) यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य ता. मालेगाव जि.वाशिम मालेगाव तालुकाध्यक्षपदी निवड

पै.बाळू (भाऊ) देशमुख यांचा अल्पपरिचय असा की…

ते मुळचे शिरपूर येथील आहेत. त्यांच्या रक्तातच कुस्ती आहे. कारण त्यांचे काका पै.अशोक अण्णा देशमुख हे नामांकित पैलवान होते. तोच कुस्तीचा वारसा पुढे पै. बाळू भाऊ यांनी चालविला. शिरपूर येथे राजे संभाजी तालमीत त्यांनी पै .बबन बुरड (वस्ताद) व पै. अशोक (अण्णा) देशमुख (वस्ताद) यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरविले.

पै.बाळू (भाऊ) यांनी कुस्ती मैदानात प्रेक्षणीय कुस्त्या करत अनेक नामवंत मल्लांना अस्मान दाखवून कुस्ती प्रेमींच्या मनावर राज्य केले. आजही बाळू भाऊ यांचे नाव घेताच कुस्ती प्रेमींच्या अंगावरती काटा उभा राहतो. पै बाळू भाऊ हे एकेरी पट काढण्यात तरबेज होते. त्यांचा हुकमी डाव निकाल होता.
आता सलग 5 वर्ष झाले ते शिरपूर येथे जानगीर महाराज संस्थानतर्फे महाशिवरात्रीला निकाली कुस्तीचा महासंग्राम घेतात. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्या वर्षी माजी विदर्भ केसरी पै.संजय भाऊ तिरातकर हे उपस्थित होते. दुसऱ्या वर्षी कुस्ती सम्राट पै अस्लम काझी तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके चवथ्या वर्षी
पै.महेंद्र देवकते बठान असे नामवंत मल्ल उपस्थित होते. या मैदानासाठी महान भारत केसरी पै.कृष्णकुमार, पै.संग्राम पाटील, पै.गोकुळ आवारे, पै.महारुद्र काळेल, पै.सुनील शेवतकर, पै.सचिन चव्हाण, पै.सागर मोटे पै.सोमवीर (आर्मी), पै.भाऊ पांढरे … इ. अनेक नामवंत मल्ल खेळलेले आहेत. विदर्भातील एक मोठे मैदान पै.बाळू भाऊ देशमुख हे दरवर्षी घेतात.

सध्या ते राजे संभाजी तालमीचे वस्ताद म्हणूनही काम पाहतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्ल सराव करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या पै.अर्जुन बबनराव देशमुख हा विदर्भ चॅम्पियन झालेला आहे.
पै. सुमित बरांडे हा सलग तीन वर्षे राज्य पातळीवर खेळत आहे. तसेच अनेक पैलवान मैदानेही गाजवत आहेत. कुस्ती बरोबरच कब्बड्डी या खेळासाठीही ते मार्गदर्शन करीत असतात. त्यात त्यांचे अनेक शिष्य राज्य पातळीवर चमकलेले आहेत.

गणेशोत्सव,नवरात्रौत्सव शिवजयंती, रामनवमी… इ. उत्सव साजरे करून यामाध्यमातून ते नेहमीच समाजपयोगी कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन व नियोजन ते करीत असतात. अनेक गरीब व होतकरू खेळाडूंना ते नेहमीच सर्वोतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करतात.

अशा या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या, शांत संयमी व मनमिळावू स्वभावाच्या, लाल मातीची मनोभावे सेवा करणाऱ्या, अनेक मल्लांचे खेळाडूंचे आधारस्तंभ व आश्रयदाते असणारे मा. बाळासाहेब देशमुख यांची मालेगाव तालुका अध्यक्षपदी निवड करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघाचे कार्य मालेगाव तालुक्यात वाढावे यासाठी आई भवानी त्यांना उदंड शक्ती देवो ही प्रार्थना.

🙏धन्यवाद🙏
पै. गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Whatsapp 9850902575,9511802074

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close