You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

होम डिलिव्हरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या गॅस वितरकाची संतप्त ग्राहकाने केली तक्रार !

शिरपूर येथील प्रकार; इंडेन गैस वितरकाची मनमानी;

शिरपूर जैन येथील साहिल इंडेन ग्रामीण गॅस वितरकाची मनमानी सुरू असून ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी देण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याचे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार शिरपूर येथिल ग्राहक किशोर प्रकाशराव देशमुख यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ रोजी केली आहे.

किशोर प्रकाशराव देशमुख यांनी तक्रारीत नमूद केले कि, शिरपूर जैन येथील साहिल इंडेन ग्रामीण गॅस वितरक शिरपूर जैन यांचे कडून गॅस सिलिंडर ची बुकिंग केली असता त्यांचे कडून होम डिलिव्हरी देण्यास मनाई करत आहेत, तसेच सदर गॅस वितरक यांचे येथून एक खासगी इसम ग्राहकांना ब्ल्याक मध्ये सिलिंडर देत आहे. तसेच गॅस घरी नेऊन देऊन त्यांचे कडून २० ते ५० रुपये घेत आहेत. शिरपूर जैन येथे साहिल इंडियन ग्रामीण गॅस वितरक यांच्यामार्फत शिरपूर शहराला व इतर ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते ग्राहकास घरपोच गॅस सिलेंडरची डिलिव्हरी देणे व इतर सेवा देणे बंधनकारक आहे. येथील साहिल इंडियन गॅस वितरकांना मनमानी कारभार चालू असून प्रत्येक ग्राहकाकडून होम डिलिव्हरीचे २० ते ५० रुपये रक्कम ग्राहकाकडून वसूल केल्या जात आहे. प्रत्यक्षात कंपनी ग्राहकाकडून ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून घरपोच डिलिव्हरी पूर्ण पैसे घेतल्या जातात परंतु येथील गॅस वितरक एका खाजगी इसमा मार्फत जास्त पैशाची वसुली केल्या जात आहे असे किशोर देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी , पुरवठा अधिकारी, तहसीलदार कुठे तक्रार करा. आमचे कोणी काही करू शकत नाही. कारण त्यांच्याशी आमचे अर्थपूर्ण संबंध आहेत असे सांगत उद्धटपणाची वागणूक देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे.

सदर गॅस वितरक ग्राहकांची राजरोसपणे फसवणूक व पिळवणूक करीत आहे. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे तक्रारकर्त्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे तक्रारीच्या प्रतीलीपी माननीय मंत्री संजय धोत्रे, संजय राठोड पालकमंत्री वाशिम, जिल्हाधिकारी वाशिम व तहसीलदार मालेगाव यांना देण्यात आले आहेत. सदर तक्रारीची दाखल घेत वितरकावर काय कारवाई होते याकडे परिसरातील त्रस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे.

३० तारखेला किशोर देशमुख यांनी स्वतः येवून सिलिंडर नेलेले आहे. त्यांनी जर १४ तारखेला तक्रार दिली असेल तर माझ्याकडे त्यांनी १४ तारखेला सिलिंडरची मागणी केलेली नाही. आणि नियमानुसार  १४ दिवसात दुसरे सिलिंडर देता येत नाही. कुणाकडूनही जादा पैशाची मागणी केली जात नाही. * सलीम परसुवाले – संचालक,  साहिल इंडेन ग्रामीण गैस वितरक शिरपूर


Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close