You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळा

औरंगाबाद – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी येथील शाळेत दिनांक १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसठी व्यसनमुक्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळे , मुख्याध्यापक सुनील चिपाटे, डॉ. हरिशचंद्र रामटेके , राजू खिलारे, व्यसनमुक्ती प्रचारक संजय काळे, व्यसनमुक्ती मार्गदर्शक व प्रचारक पदिप माळी, यांची उपस्थिती होती.
या व्यसनमुक्ती कार्यशाळेत प्रदिप माळी यांनी सविस्तर माहिती दिली.
व्यसनापासून होणारे दुष्परिणाम, विविध आजार, कौटुंबिक उध्दवस्त परिस्थिती बाबत माहिती दिली. संजय काळे आणि डॉ. हरिशचंद्र रामटेके यांनी व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे, मोठ्या प्रमाणात कार्यशाळा आयोजित करून जनजागृती केली जाईल असे सांगितले.
या कार्यशाळेस बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
व्यसनमुक्ती कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक पदमसेना नागदेवे, अनिता राठोड, रिता मार्कंडे, विद्या सोनोने, योगिता देवकाते, संगीता कदम. यांनी परिश्रम घेतले.
व्यसनमुक्ती कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. हरिशचंद्र रामटेके यांनी केले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close