You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिरपूर जैन येथील देशी दारूचे दुकान मनुष्य वस्ती बाहेर हलवण्याची मागणी

Story Highlights

  • सरपंचा सौ .सुनिता अंभोरे - ग्रा.प.शिरपूरला शासनमान्य देशी दारू दुकान हटविण्याची मागणी करणारा अर्ज प्राप्त झाला असून ग्रा.प.तर्फे योग्य तो पाठपुरावा करून सदर दुकान नियमानुसार गावा बाहेर स्थलांतरित करण्याची कारवाई होण्यासाठी सर्व स्तरावर प्रक्रिया केली जाईल.

शिरपूर   (प्रतिनिधी)

            शिरपूर जैन येथील देशी दारूचे दुकान हे मनुष्य वस्ती बाहेर हलविले जावे या करिता शिरपूर येथील नितीन रमेश भालेराव यांनी जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन मागणी केली आहे. शिरपूर जैन येथे वार्ड क्र. ३ मध्ये सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून सदर दुकान उघडण्याची वेळ हि शासन नियमाप्रमाणे सकाळी १० ते रात्री १० असून त्या नियमाला पायदळी तुडवत सदर दुकानदार दुकान सकाळी ६ वाजता उघडतात. आणि रात्री उशिरापर्यंत दुकान सुरु ठेवतात.तसेच सदर दुकान  हे मनुष्यवस्तीमध्ये वर्दळीच्या ठिकाणी असून महिला, मुली आणि विध्यार्थिनी यांच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर आहे. सदर दुकानासमोर तळीराम(दारू पिणारे) मोठ्या संख्येने असतात. अनेक वेळा दारूच्या नशेत भांडण- तंटे होतात. त्यामुळे महिला, मुलीची छेड काढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे काही झाल्यास शहरात एखादी अनुचित घटना घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा  गंभीर प्रश्न उदभवू शकतो, या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सदर देशी दारूचे दुकान हे शासनाच्या नियमाप्रमाणे शिरपूर शहरा बाहेर मनुष्य वस्तीपासून अंतरावर स्थलांतरित केले जावे. तसेच दुकान उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेचे दुकानदाराने पालन करावे अशी व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी निवेदन द्वारे भालेराव यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग,वाशीम, जिल्हा पोलीस अधीक्षकसाहेब, वाशीम, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, वाशीम, ठाणेदार साहेब, पोलीस स्टेशन शिरपूर, सरपंच/सचिव साहेब,ग्रा.पं.कार्यालय शिरपूरला केली आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close