You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

सोयाबिन च्या सुडीला आग लागून 81हजार रुपयांचे नुकसान

साक्रापूर येथील घटना

तीवळी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या साक्रापूर येथील शेतकरी यांची 4 एकरातील सोयाबीनची सुडी अज्ञातांनी पेटवून दिली सदर घटना दि 20 10 19 रोजी सायंकाळी 7.30 चे दरम्यान घडली

तीवळी पासून जवळच असलेल्या ग्राम साखरापूर येथील शेतकरी कैलास तुळशीराम उबाळे यांच्याकडे एकूण चार एकर जमीन आहे गट नंबर 10/1 असा आहे. त्यामध्ये सोयाबीनचे पीक पेरले होते सदर सोयाबीनची शेतातच एका ठिकाणी सुडी लावली होती व शेजारीच उंबराच्या झाडावर स्पिंकलर चे 30 पाईप ठेवले होते. दि 20 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सोयाबीन च्या सुडीला अचानक आग लागलेली दिसली शेजारील लोकांनी व तक्रारदाराने शेताकडे धाव घेतली तेव्हा सोयाबीनच्या सुडीला आग लागलेली होती शेजारच्या शेतकऱ्यांनी पाणी टाकून सदर आग विझवली आगीमध्ये सदर शेतकऱ्याचे स्पिंकलर 30 पाईप किंमत 30 हजार व 14 ते 16पोते सोयाबीन किंमत51हजार असे एकूण 81 हजाराचे सदर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे या शेतकऱ्याची दिवाळी अंधारातच गेली आहे. कैलास तुळशीराम उबाळे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी एनसीआर 427 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहे दामोदर इप्पर हे करीत आहेत तेथील तलाठी यांनी 81 हजाराचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद करून तहसीलदार यांना कळवले आहे.
सुडीला आग लावऱ्याचा शिरपूर पोलिसांनी त्वरित शोध घ्यावा व प्रशासनकडू त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी त्या शेतकऱ्याने केली आहे

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close