You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

माजी नगरसेवक शाॅक लागुन मुत्यु

मुकरम अखतरखॉ पठाण

गेवराई दि. 27 : प्रतिनिधी : येथील माजी नगरसेवक मुकरम अखतरखॉ पठाण यांचा विजेचा शॉक लागुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.२७ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. मुकरम पठाण हे उत्तम फुटबॉलपटू होते.
येथील माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते मुकरम अखतरखॉ पठाण यांच्या राहत्या तळ घरामध्ये पावसाचे पाणी जमा झाले होते. पाणी काढण्यासाठी त्यांनी विद्युत मोटार लावून पाणी काढण्याचा प्रयत्न केला. पाणी काढून झाल्यावर प्लगची पीन काढताना त्यांना अचानक विजेचा शॉक लागल्याने ते जाग्यावर कोसळले. त्यांच्या मुलाने त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी रूग्णालयात गर्दी केली होती. मुकरम पठाण यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. ते उत्तम फुटबॉलपटू होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा मुलगी, दोन भाऊ ,बहिण असा परिवार आहे. मुकरम यांच्या मृत्यूच्या बातमीने शहरात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांना धक्का बसला आहे. त्यांचा दफनविधी सोमवार दि.२८ रोजी सकाळी ९ वाजता तकिया मस्जिद येथे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close