You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

किसान मानधन योजनेच्या लाभापासून शेतकरी दुरच!चोरद परिसरातील वास्तव

लक्ष्मीपुजनापुर्वीमानधन जमा करण्याची मागणी

नवनाथ गुठे/चोरद..

दिनांक..२५/१०/२०१९…

प्रतिनीधी…

प्रधानमंत्री किसान मानधन योजने अंतर्गत अल्पभुधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे मानधन जमा देखील झाले आहे. परंतु अजुनही अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासुन कोसोदुर आहेत. दिवाळीच्या लक्ष्मीपुजनापुर्वी सरकारने हे मानधन खात्यात जमा करावे, अशी मागणी चोरद परिसरातील शेतकरी करीत आहेत. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात ६-हजार रुपये मानधन दिले जाते. येथील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणुन ग्रामविकास अधिकारी यांनी प्रत्येक गावातील अल्पभुधारक शेतकऱ्यांकडून बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स प्रत,आधार कार्ड व इतर महत्त्वाचे कागदपत्रे जमा केले होते. त्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांना योजनेचा लाभ ताबडतोब बँकेच्या खात्यात पैसे जमा होऊन मिळेल अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर प्रत्यक्षात या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली होती. या अनुषंगाने काही शेतकऱ्यांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा झाली. परंतु, अजुनही बरेचसे शेतकरी किसान मानधन योजनेच्या लाभापासुन वंचित आहेत. काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन टप्प्याची रक्कम जमा झाली. तर काही शेतकऱ्यांना अजुन मानधनाचा एकही छदाम मिळाला नाही. समंधीत असे शेतकरी वेळ मिळेल त्यावेळी बँकेत जाऊन पासबुकवर शेतकरी मानधन योजनेच्या रकमेची एंट्री झाली का? हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना त्यात पैसे जमा झाल्याचे दिसून येत नसल्याने त्यांची निराशा होत आहे. तरी या योजनेच्या लाभापासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने नवीन यादी तयार करावी व त्यांना दिवाळीच्या लक्ष्मी पुजनापुर्वी मानधन द्यावे,अशी मागणी अल्पभुधारक शेतकऱ्यांमधुन होत आहे. गलथानपणा मानधनाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात मंगरूळपिर तहसील प्रशासनाद्वारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ दिल्या जात आहे. त्याअंतर्गत चोरद येथील बाबाराव गुठे यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.परंतु, प्रत्यक्षात त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. खात्री केली असता ही रक्कम अन्य दुसऱ्याच्या व्यक्तीच्या खात्यात टाकण्यात आली असून ,त्यांनी सदर रक्कम फस्त केल्याचे दिसुन येते. प्रशासकीय अधिकारी व समंधीतावर कारवाई व्हावी…खाते क्रमांक एकाचा व रक्कम दुसऱ्याच्या खात्यात वर्ग करणाऱ्या समंधीत प्रशासकीय अधिकारी आणि चुकीने खात्यात रक्कम आल्याची पुर्वकल्पना असतानाही ती रक्कम काढून खर्च करणाऱ्या समंधीत व्यक्तीवीरुध्द कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. खातेक्रमांक चुकल्यामुळे मानधनाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जाण्याचे प्रकार वाढत चालले आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close