You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

पुरेशा प्रमाणात विद्युत रोहीत्र उपलब्ध ठेवा; शेतकरयांना दिवसा किमान 12 तास विज द्या – गणेश अढाव

शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांनी अधिक्षक अभियंता, म.रा. वि. वि. कंपनी लिमिटेड वाशिम यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

वाशिम:- दि. 22
जिल्ह्यातील शेतकरयांच्या शेती पीकाचा रबी हंगाम सुरू होणार आहे. म्हणून गहू, हरभरा व तूर, भाजीपाला इ. पीके विद्युत मोटरच्या साहाय्याने जलस्त्रोतांचा वापर करून घेतली जातात. शेतीतील कृषी पंप धारक विज ग्राहक संख्या व सद्यस्थितीत उपलब्ध विद्युत रोहीत्र संख्या यामध्ये नियमानुसार प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे अनेक रोहित्रांवर अधिभार ( ओवहरलोड ) आहे. परिणामी शेतकरयांना जेव्हा पिकाला पाणी द्यायचे असते तेव्हाच हे अधिभार असलेले किंवा नसलेले अनेक रोहित्र अनेक तांत्रिक कारणामुळे जळतात किंवा बंद पडतात. म्हणून अशा बंद पडलेल्या रोहित्रांच्या बदल्यात त्याठिकाणी तात्काळ दुरूस्त अथवा नवीन सुरू असणारे विद्युत रोहीत्र मिळावे यासाठीची व्यवस्था म्हणून माहे नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत दुरूस्त व सुरू अवस्थेत असलेले विद्युत रोहीत्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे व शेतीतील मोटर पंपाला दिवसा ( दिनात ) 12 तास विज पुरवठा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांनी अधिक्षक अभियंता, म. रा. वि. वि. कंपनी लिमिटेड वाशिम यांना दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दिलेल्या पत्रात केली आहे. मुख्य अभियंता, म. रा. वि. वि. कंपनी लिमिटेड अकोला विभाग व कार्यकारी अभियंता तसेच जिल्हाधिकारी, वाशिम, यांना पत्राच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

पत्रात अढाव यांनी सविस्तर लिहले आहे की, रबी हंगामात कृषी पंपाचा विज पुरवठा बहुदा रात्रीच्या वेळी व तीन (3) ,सहा (6) तास एवढाच सुरू ठेवला जातो. परिणामी शेतकरी बांधवांना शांततेची झोप तर घेता येतच नाही; परंतु शेतातील हिंस्त्र वन्यजीव व काट्या-कुपाट्या, गवत, तण आदिंमधील साप इत्यादी विषारी प्राण्यांपासून त्यांच्या जीवित्वास धोका निर्माण होतो. आजवर अनेक शेतकरयांच्या बाबतीत असे दुर्दैवी प्रकार घडलेले आहेत. आधीच नैसर्गिक वातावरणातील बदल व आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात व्यवस्थारूपी संकटांशी लढताना शेतकरी वर्ग सर्व बाजूंनी हतबल होत चालला आहे. आपल्या कंपनीचे व शेतकरयांचे मागील अनेक वर्षांपासून अतुट नाते आहे. म्हणून शेतकरयांना पीकाला आवश्यक तेव्हडे व दिवसा पाणी देता यावे याकरिता 12 तास दिवसा विज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करतानाच शेतकरयांच्या निकडीचा फायदा घेत रोहित्र देण्यासाठी पैसे, नेण्यासाठी ट्रॅक्टर अथवा अन्य वाहन आणा, वशिल्याने रोहित्र देणे इत्यादी प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, खबरदारी घ्यावी अशा विनंती पुर्वक मागण्या अढाव यांनी पत्रात केल्या आहेत. मागण्यांची पुर्तता न झाल्यास वा शेतकरयांची आर्थिक, मानसिक, शारिरीक पिळवणूक करणारे प्रकार निदर्शनास आल्यास संघटना तीव्र आंदोलन करेल व होणारया परिणामास कंपनी जबाबदार असेल असा इशारा अढाव यांनी पत्रात दिला आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close