You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिरपूर येथे शांततापूर्ण वातावरणामध्ये मतदान संपन्न

शिरपूर बातमीदार तारीख 21 ऑक्टोंबर

ऐकून 67%मतदान

शिरपूर येथे सकाळपासूनच रिमझिम पावसाततही मतदारांनि मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या,मतदान शांततापूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले.
एकूण 12462 मतदारांपैकी 8397 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकूण 67.38% एवढे मतदान झाले एकूण बारा बुथवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला रिमझिम पावसातही मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला, सकाळीच मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगाच्या रांगा दिसत होत्या , यावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. निवडणुकीदरम्यान प्रशासनाच्यावतीने बूथ लेवल ऑफिसर( BLO)मार्फत मतदारांच्या मतदार यादीच्या मतदार चिठ्ठी निवडणुकीच्या दिनांका पूर्वीच मतदारांना वाटप करण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र काही BLO नि मतदार चिठ्ठीचे वाटपच केले नव्हते त्यामुळे अनेक मतदारांची वेळेवर तारांबळ उडाली होती.त्याचा सुद्धा मतदानावर काही अंशी परिणाम झाला.एकूण मतदान शांततेत पार पडले दरम्यान पो. नि. दिगंबर इंगळे यांचे मार्गदर्शनात व पीएसआय चंदन वानखडे यांच्यासह पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close