You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

चोरद येथे जिल्हा वाहतूक शाखेकडून वाहन तपासनीच्या नावाखाली वाहतूक पोलिसांची दमदाटी

Story Highlights

  • "वाहतूक शाखेकडून दरदिवशी नियमित वाहनांची तपासणी करून नियमबाह्य वाहतुकीविरुध्द दंडात्मक कारवाई केल्या जाते मात्र वाहनधारकासोबत अरेरावी केल्याचा प्रकार कधी घडला या संदर्भात माहिती नाही…. बाबुसिंग राठोड…. जिल्हा वाहतूक निरीक्षक.

नवनाथ गुठे/ चोरद…

प्रतिनीधी….चोरद येथुन जात असलेल्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावर जिल्हा वाहतूक शाखेकडून दरदिवशी वाहनांची तपासणी केली जाते. यासाठी दरदिवशी महामार्गावरील चोरद फाटा येथे तपासणी करतांना वाहतूक पोलीस वाहनधारकासोबत ऊध्दटपने वागत असल्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यामुळे नियमानुसार वाहनांची तपासणी करून दंड आकारणी सोडून वाहनधारकासोबत आरेरावी करण्याचा अधिकार पोलीसांना कुणी दिला असा संतप्त सवाल वाहनधारकाकडुण विचारला जाऊ लागला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडुण ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारुन वाहन तपासणी केल्या जात आहे. याशिवाय जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख अधिकारी कर्मच्यारी सुध्दा नित्यनेमाणे वाहनाची तपासणी करतात.मात्र वाहनतपासनीसाठी वाहतूक शाखेला चोरद फाटा सुरक्षित स्थळ का वाटते हे न ऊलगडनारे कोडे बनले आहे. दरम्यान, वाहतूक कर्मच्याऱ्याकडुण लहान मोठ्या वाहनांची तपासणी करतांना दमदाटी केल्या जात असल्याचा प्रकार शुक्रवारी सुद्धा घडला. यावेळी काही वाहतूक कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालकाला थांबवून ऊध्दटपने कागदपत्रांची मागणी करुन शिवीगाळ केली. महामार्गावर नित्याचाच झालेल्या प्रकारामुळे वाहनधारक त्रस्त झाले असुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन उर्मठ कर्मचाऱ्यांवीरुध्द कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे……….

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close