रिसोड- मालेगाव मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात बार, दारू, आणि नॉनव्हेज पार्ट्यां जोरात
रिसोड- मालेगाव मतदार संघात जातीपातीच्या राजकारणाचा जोर वाढला

Active न्युज टीम
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची २१ तारीख निश्चित झाली असून रिसोड मालेगाव विधानसभा प्रत्येक उमेदवारांकडून जोरात प्रचार चालू आहे. प्रचारात व्यस्थ असणारे कार्यकर्ते संध्याकाळी चार्ज होऊन तुरर झालेले दिसत आहेत. आज रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची धामधूम संपली असून आता प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी गाठी आणि गठ्याची जुळवाजुळव सुरु झालेली आहे. एकमेकांच्या सुखदुखात नेत्यांच्या आधी धावून जाणारे शेजारी सुद्धा जातीपातीचे राजकारण करतांना आपल्याच जातीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल यासाठी जोर लावत आहेत. त्यासाठी मतदारांना वेगवेगळी प्रलोभने आणि भीती दाखवली जात आहे, जाती सोबत माती खाण्याची जाणीव मतदारांना करून दिली जात आहे. आपला उमेदवार निवडून आला तर आल्या जातीचे कशा प्रकारे वर्चस्व राहील हे एकमेकांना सागितले जात आहे. नेत्यांच्या या लढतीत मात्र कोंबड्या आणि बोकडांचा मात्र रोज बळी जात आहे.

निवडणुकीत आपल्याच पक्षाची उमेदवारी व आपलाच उमेदवार सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचावा आणि आपल्यालाच मतदान व्हावे यासाठी प्रचारात आघाडी घेण्यासाठी उमेदवार नवनव्या युक्त्या, क्लुप्त्या वापरून मतदारांच्या बांधावर व वाड्या-वस्त्यांवर पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. याकरिता पिणारांना दारू आणि खाणारांना मटणाची कसलीही कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. अतिउत्साही व सर्वसामान्य छोटया कार्यकत्र्यांना साहेब दोन दिवस ढाब्यावर नेतील मात्र पुन्हा घरची तांब्या व ताटलीच लागणार आहे. कार्यकर्ते आलेली संधी न दवडता हॉटेल,मध्ये पेगवर पेग रिचवत साहेबांना किती मतांच लीड येणार यावर घोटागणीस वाफ काढत बसले आहेत. विधानसभेच्या या निवडणुका ढाबेचालकांच्या, बारमालकांच्या, दारू दुकानदारांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. राजकीय नेते रात्रं- दिवसभर प्रचारात भुर्र्र करून फिरत असून कार्यकर्ते दिवसभर मतदारांच्या भेटीला जात असून दिवसभर वणवण केल्यानंतर सायंकाळी मात्र एखाद्या ठिकाणी येऊन तर्रर होतानाचे चित्र रिसोड-मालेगाव विधानसभा मध्ये सर्वत्र दिसू लागले आहे. रात्रीच्या वेळी बार, दारू दुकाने आणि ढाबे ज्या ठिकाणी आहेत तिथे प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला मिळत असून काही कार्यकर्ते एकाची पिऊन दुसऱ्याकडे खायला सुद्धा जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. काही फक्त फुकटची मिळत आहे म्हणून पिण्याचे व्यसन लावून घेत आहेत. तर काही देशी पिणारे विदेशीची चव घेण्याची हौस भागवून घेत आहेत. एकूणच मंदीच्या नावाने बोंबा मारणारांची सुद्धा चांदी होतांना दिसून येत आहे.
