You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

कारंजा येथे १ कोटी ८५ लाखांची अफीम जप्त;

प्रतिनिधी / कारंजा


वाशीम जिल्ह्यातील तपोवन तालुका कारंजा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कार्यवाही मध्ये १ कोटी ८५ लाख रुपये किंमतीचे अफीम व इतर मुद्देमाला सह तीन आरोपींना पकडण्यात आले आहे. सदर गुन्हेगार टोळीआंतर राज्यीय असल्याची माहिती आज दि.१0 ऑक्टोबर रोजी कारंजा येथे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.


पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईमध्ये तपोवन येथील धाब्यावर छापा टाकून झडती घेतली असता सदर धाब्यामध्ये ३६७ किलो ७२ ग्रॅम एवढया वजनाची अफीमची पॉवडर सापडली याची किंमत प्रति किलो ५0 हजार रुपए असून त्याची बाजार भावाप्रमाणे विंष्ठमत १ कोटी ८३ लाख ८६ हजार रुपए असून सोबतच तीन आरोपीकडून तीन मोबाईल एक मोटार सायकल रोख १४ हजार रुपए असा एकूण १ कोटी ८५ लाख ९६ हजार १३0 रुपए किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये बिलाल खान शेरू खान राहणार मदारपुरा जिल्हा मनसोर, तोफिक खान गुरूखान, प्रतापसिंग बुटासिंग या अंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीला अटक करण्यात आली. अपराध क्रमांक ३४१/१९ अमली औषधद्रव्य व मनप्रभावीत पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम १७, २२ व २९ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पोलिस उपअधीक्षक मृदुला लाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर, अजयकुमार वाडवे, उपनिरीक्षक भगवान पायघन, भगवान गावंडे, किशोर चिंचोळकर, प्रशांत राजगुरू, सुनिल पवार, अमोल इंगोले, राजेश राठोड, प्रेमदास आडे, मुकेश भगत, अश्‍विन जाधव बालाजी बर्वे, संतोष शिनकुडे, रामनागुलकर, राजेश गिरी, रेश्मा ठाकरे, रमेश थोरवे, शाम इंगळे यांनी ही कारवाई केली.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close