You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपामध्ये होणार विलीन

वृत्तसंस्था/ सिंधुदुर्ग

नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष येत्या १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये विलीन करण्यात येणार असल्याची माहिती स्वत: नारायण राणे यांनी दिली आहे. काही महिन्यांपासून भाजपात ‘मेगा भरती’ सुरू आहे. इतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, नारायण राणे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित होत नव्हता. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर नारायण राणे यांनीच आपल्या भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे.
राजन तेली यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी येथे आलेले असताना नारायण राणे यांनी माहिती दिली. नारायण राणे म्हणाले की, कोकणात भाजप दिवसेंदिवस मजबूत होत आहे. यापूर्वीच नितेश राणे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. नारायण राणे भाजपचे सहयोगी खासदार असले तरी त्यांचा अद्याप भाजपा प्रवेश झालेला नाही. हा भाजप प्रवेश येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रवेशासोबत नारायण राणे आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन करणार आहेत. मुख्यमंत्री कणकवलीत येऊन प्रचार काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कणकवलीत भाजप विरुद्ध सेना आमने-सामने आहेत. शिवसेनेच्या विरोधात मालवण आणि सावंतवाडी मतदार संघात अपक्ष उमेदवार उभे आहेत. त्यांना भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांचा जाहीर पाठिंबा आहे. भाजपा आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते शिवसेना उमेदवाराचा पराभव करण्यासाठी एकवटले आहेत.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close