You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

मातंग समाज बांधवांच्या वतीने इनई माता मिरवणूक व विसर्जन संपन्न

शिरपूर दि.१०/१०/२०१९ (प्रतिनिधी)

शिरपूर जैन येथे दिनांक १० अक्टोबर २०१९ रोजी मोठ्या उत्साहात मातंग समाजाच्या वतीने इनई माता मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव व माता बघिनी उपस्थित होत्या.

शिरपूर जैन येथे पिड्यान पिड्या इनई मातेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.अविरत चालू आहे. यामध्ये दसऱ्याच्या आधीच्या दिवशी इनई मातेच्या मूर्तीची स्थापना केली जाते. व नवदुर्गा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मूर्ती शिरपूर मधून आप्पा वेटाळ, ते मेन रोड मधून विश्वकर्मा देवस्थान गुजरी मधून मुलींच्या जि प शाळेजवळून बस स्थानक चौक ते पोलीस स्टेशन समोरून आई भवानी संस्थान जवळील  दगडुजी तायडे यांच्या शेतात नेऊन ठेवण्यात येतात. सुरुवातीला फक्त देवीचे मुखवटे स्थापण केले जायचे व डोक्यावरून त्याची मिरवणूक डफड्याच्या तालावर नृत्य करीत व पोत्राजाची गाणे म्हणत साजरे केले जात असत, नंतर काळाच्या बदलाप्रमाणे मुखवट्याची जागा मूर्तीने घेतली मिरवणूक डोक्यावरून लोट गाड्यावर आली पुढे,टेम्पो, व आता ट्रकटर व आधुनिक वाद्याच्या तालावर सुरु झाली, उत्सव काळात तिन्ही दिवस पोतराजाची गाणी,देवीची गाणी, गायली जाते मोठ्या उत्साहात हा सन साजरा केला जातो. समाजाबाहेरील कुणाकडूनही कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता दरवर्षी स्थापना केली जाते, त्यामध्ये महाप्रसाद समाजबांधवांमध्ये वितरीत करण्यात येतो.यावर्षी उत्सव मंडळाचे अध्यक्ष गजानन कळनु कांबळे अध्यक्ष,किशोर रामचंद्र कांबळे उपाध्यक्ष हे होते तर समाजातील नामदेव कांबळे,रवी कांबळे,विठ्ठल कांबळे, संजय कांबळे, विश्वनाथ कांबळे, शाम कांबळे, आत्माराम कांबळे, भगवान कांबळे,दयाल कांबळे,अनंत ताकतोडे व इतर समाज बांधव व होतकरू तरुण नवयुवक सहभागी होते.

            मातंग समाज बांधवांच्या या उत्सवमध्ये मूर्ती हि पाण्यात विसर्जीत न करता मातीच्या मुर्त्या ह्या शेतातील झाडाखाली ठेवल्याजातात कालांतराने त्या मातीत विसर्जित होतात यामध्ये कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा किंवा पाणवठ्याचे प्रदूषण होत नाही हे विशेष उल्लेखनीय.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close