You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

सरकार पाडण्याचे ते दिवस विसरा; उद्धव ठाकरेंचा पवारांना सणसणीत टोला.

विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता चांगलाच रंगला असून शिवसेना-भाजप महायुतीच्या सभा जोरदार पार पडत आहेत. विरोधकांनी देखील कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. जालना येथे आज झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे सरकारच राहणार असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे विधान सभेत केले होते. या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शरद पवार यांनी वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्यांचा सरकार पाडण्याचा, घालवण्याचा अनुभव दांडगा आहे. ते दिवस विसरा आता, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आता ही निवडणूक जनतेनेच आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे पवारांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे ही ते म्हणाले.निवडणुकांचा सामने सुरू झाले आहेत. कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे आहेत, असेही ते म्हणाले.

सरकार आल्यानंतर 1 रुपयात संपूर्ण वैद्यकीय चाचण्या, 10 रुपयात जेवण आम्ही देणार आहोत, असे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर सभेत सांगितले. तसेच जे बोलेन ते करून दाखवणार, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्ती नाही तर चिंतामुक्तही करणार असल्याचे ते म्हणाले.
सभेत बोलताना ते म्हणाले की तुम्ही युतीच्या उमेदवाराला निवडून देणार का? असा प्रश्न विचारताच संपूर्ण सभेने उभे राहून त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेना झिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी सभास्थळ दणाणून सोडले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close