You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

दोन विद्यार्थिनींना पाण्यातून विषबाधा

प्रतिनिधी/ खामगाव
जिल्ह्यातील खामगाव येथील नामांकित अरजन खिमजी नॅशनल हायस्कूलमध्ये दोन विद्यार्थिनींना बॉटल मधील पाणी पिऊन विषबाधा झाल्याची घटना दि ७ ऑक्टोबर रोजी घडली. पाण्याच्या बॉटलमध्ये कुणी विषारी पदार्थ टाकल्याचे संशय विद्यार्थिनींनी बोलतांना व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. तर विषबाधा झाल्याची ही दुसरी घटना असून गेल्या सहा महिन्यापुवीं तीन विद्यार्थिनींनी विषारी औषध प्राशन केले होत्ेा यामध्ये दोघींचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे आता शाळेबाबत संशय घेऊन वेगवेगळया चर्चा होवू लागल्या आहेत.

याबाबत प्राप्त माहिती अशी की , शहरातील नामांकित अरजनजी खिमजी नॅशनल हायस्कूलमध्ये इयत्ता १२ वी त शिकत असलेल्या जया आनंदा तायडे, रुपाली गजानन थेरोकर , दोघी रा. लांजुळ या दोघींना जया तायडे हिच्या बॉटलमधील पाणी पिल्याने मळमळ व उलट्या झाल्या त्यावेळी जया हिने बॉटल मधील पाणी बघितले असता बॉटलमध्ये काळा पदार्थ असल्याचे दिसले. पाण्याचा उग्र दुगर्ंध येत होता. ते पाणी पिल्याने दोघींना उलटया झाल्या. त्या दोघींनी नातेवाईकांना फोन करून सर्व प्रकार सांगितला नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांचेवर उपचार सुरू आहे आपल्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना वर्गात विषबाधा झालेली असताना मॅनेजमेंटचे कुणीही साधी चौकशी करण्यासाठी गेले नाही त्यामुळे मॅनेजमेंट असंवेदनशील असल्याचे दिसून आले पालकांमध्ये रोष दिसून येत आहे.
याआधी सुध्दा असाच काही प्रकार घडलेला आहे. याच नॅशनल शाळेत तीन विद्याथींनींनी विज्ञानचे प्रॅक्टीकल खराब गेल्याचे कारण सांगत उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले होते. यामध्ये दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एकीचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले होते.
त्यामुळे या शाळेतील गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालकांमध्ये आता शाळेबाबत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पालक वर्गाकडून होते आहे.
तर यावेळी शाळेबाबत वेगवेगळया चर्चांना उधाण आले आहे. हे मात्र खरे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close