You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी होणार

शासन निर्णय निर्गमित; संगिताताई शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

गजानन तुपकर
तालुका प्रतिनिधी मेहकर.
9922477647.

active news बातमीची दखल

मेहकर

संगिताताई शिंदे


राज्यातील शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यात यावे अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा संगिताताई शिंदे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने सर्व शिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा सण असून प्रशासकीय धोरणामुळे राज्यातील हजारो खासगी अनुदानित ,अंशतः अनुदानित,प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सैनिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन रखडले आहे. दिवाळीपूर्वी हे वेतन न मिळाल्यास त्यांची दिवाळी अंधारात जाऊ शकते त्यामुळे कुठल्याही स्थितीत शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वीच करण्याची मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी केली होती.
राज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सैनिकी विद्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे माहे सप्टेंबर २०१९ चे वेतन ऑनलाईन पद्धतीने काढण्याचे आदेश शिक्षण विभागातर्फे वेतन पथक कार्यालयाला उशिराने देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळण्यात मोठा विलंब होत असून त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रशासनाच्या या भूमिके बद्दल नाराजी व्यक्त केल्या जात आहे. तसेच ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे वेतन रखडल्याने संताप देखील शिक्षकांकडून व्यक्त केल्या जात होता.
वेतन रखडल्यामुळे अनेकांच्या नियमित मासिक किस्त तसेच गृहकर्ज आणि इतर कर्जाचे व्याजाचे ओझे त्यांना सहन करावे लागतं होते. ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे शिक्षकांना यात मोठी अडचण होत असल्याचे चित्र होती. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता माहे सप्टेंबर चे वेतन दिवाळीपूर्वी अदा करून त्यांना दिलासा देण्याची मागणी संगीता शिंदे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे केली होती. शासनाच्या या निर्णयामुळे सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

हि बातमी सुद्धा वाचा

http://activenews.in/?p=15285(opens in a new tab)

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close