You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

कायदा पालनाबाबत आम्ही खंबीर आहोत आणि तुम्ही गंभीर व्हाःएसडीपीओ डॉ. बनसोड

सन-उत्सव लोकोत्सव करण्याचे केले आवाहन

शिरपूर : दिनांक ०५ ऑक्टोबर (प्रतिनिधी)

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन युवकांनी दुर्गा उत्सव साजरा करावा, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड यांनी केले. स्थानिक पोलीस स्टेशनमधे दि.३ ऑक्टोबर रोजी आयोजित शांतता समितीच्या सभेचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

         युवकांनी दुर्गाउत्सवामध्ये डी. जे. लावू नये व गुलालाची उधळण करु नये, असे आवाहन डॉ. बन्सोड यांनी केले. डी. जे. वर सुप्रीम कोर्टानेच बंधी घातली आहे. त्यामुळे आपण सर्व दुर्गा उत्सव मंडळांनी या आदेशाचे पालन करावे व उत्सव शांततेत पार पाडवा. उत्सवात होणाऱ्या वायफळ खर्चावर नियंत्रण मिळवून गरजू व्यक्तीस, विद्यार्थ्यांना मदत करावी; असे ही आवाहन डॉ. बनसोड यांनी याप्रसंगी केले. युवकांनी सण उत्सव साजरे करीत असताना आपल्या हातून कायदा मोडल्या जाणार नाही. याची काळजी घ्यावी. आपल्यापासून इतर कोणास त्रास होणार नाही. याची दक्षता घ्यावी. शांततेने जर उत्सव साजरे केले. तर समाजाची गावाची प्रगती होण्यास मदत होते. दुर्गाउत्सव साजरा करीत असताना शस्त्रास्त्र बाळगू नये व कायदाभंग करुन आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये.अशा उत्सवातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून सन-उत्सव हे लोकोत्सव होण्यासाठी प्रयत्न करावेत. शिवाय कायदा पालनाबाबत पोलीस प्रशासन खंबीर आहे, आपण मात्र कायदा पालनाबाबत गंभीर व्हावे, असे आवाहन त्यांनी आपल्या मनोगतातून केले.

     या वेळी मंचकावर शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. बी. इंगळे, पी. एस. आय. शरद साठे, पी. एस. आय. चंदन वानखेडे उपस्थित होते. सर्व प्रथम ठाणेदार इंगळे यांनी डॉ बनसोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी प्रा भालेराव, विकास चोपडे, कैलास भालेराव, नंदकिशोर उल्हामाले, अस्लम पठाण यांनी ही आपले विचार मांडले. यासभेस स्थानिक सर्व पक्षीय पुढारी प्रतिष्ठित नागरिक, दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी व गावातील जागरुक नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक प्रशांत देशमुख यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close