You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

वाघी बु येथे वीज कोसळून एक तरुनाचा मृत्यू

शिरपूर : ०५ ऑक्टोबर २०१९ (प्रतिनिधी)

                शिरपूर येथून जवळच असलेल्या वाघी बु. येथील अंकुश शंकर बहिरे या तरुणाचा अंगावर विज कोसळून मृत्यू झाला आहे.

वाशीम जिल्हा व परिसरात सोयाबीन सोंगनीचा हंगाम असून परिसरातील मजूर  न मिळाल्याने शालेय विध्यार्थी सुद्धा शेतातील सोयाबीन सोंगनीच्या कामाला जातात. अंकुश हा इयत्ता ११ वि चा विध्यार्थी असून तो खंडाळा शिंदे येथील समाज प्रबोधन विध्यालयाचा विध्यार्थी आहे. दिनांक ०५/१०/२०१९ रोजी दुपारी परिसरात अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी अंकुश हा गावातीलच एका शेतात मजुरीने सोयाबीन सोन्गानीचे कामाला गेला होता. पाऊस सुरु झाल्याने सर्व मजूर घरी निघाले त्यांचे सोबत अंकुश सुद्धा निघाला रस्त्याने सर्वात समोर अंकुशच होता अचानक जोराचा आवाज होऊन अंकुशच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याला तातडीने वाशीम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंकुश हा शंकर बहिरे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close