ब्रेकिंग

मदतीपासून वंचित पुरग्रस्तांच्या जनाक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिग्रस येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पुढाकार

0 0 6 4 5 1
[wonderplugin_carousel id="1"]

 

दिग्रस येथे २२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच असंख्य लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच अनेकांच्या जमिनी खरडून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तसेच पुराच्या पाण्यामुळे कित्येक घरांची पडझड होऊन अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत मात्र दहा दिवस उलटून सुद्धा अद्याप पर्यंत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणतेही कर्मचारी अथवा अधिकारी आले अथवा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिली नाही.
नुकतेच शासनाने सरसकट १००००/रू.मदत देण्याबाबत अध्यादेश काढला आहे मात्र शासनाच्या या अध्यादेशाला केराची टोपली दाखवून केवळ ५०००/रू‌ चे धनादेश काही पुरग्रस्त बांधवांना देण्यात आले आहे अशा बिकट परिस्थितीत न्यायाच्या अपेक्षेने पुरग्रस्त बांधवांनी भरपावसात घरोघरी जाऊन नुकसानीची पाहणी करत असताना आपल्या वेदना मा.श्री.संजयभाऊ देशमुख माजी राज्यमंत्री यांना सांगीतल्या तेव्हा सर्व सामान्यांच्या वेदना संवेदनेच्या सभागृहात तारांकीत करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५००००/रू.अनुदान देण्याबाबत तसेच खरडून गेलेल्या जमीनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुरूस्ती करून देण्याबाबत तसेच शासनाचे अध्यादेशाप्रमाणे पुरग्रस्त बांधवांना त्वरीत १००००/ रू.चे धनादेश देण्याबाबत आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) दिग्रस तालुक्याच्या वतीने मंगळवार दि.१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वडवाला जिनिंग दिग्रस येथून मा.श्री.संजयभाऊ देशमुख माजी राज्यमंत्री यांच्या नेतृत्वात शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.प्रविणभाऊ शिंदे, महंत सुनील महाराज, सेवानिवृत्त न्यायाधीश अँड.किशोर राठोड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा काढून दिग्रस तहसील कार्यालयावर धडक देऊन विविध मागण्यांबाबत मा.तहसिलदार दिग्रस यांना निवेदन दिले.
यावेळी सतिषभाऊ तायडे सभापती कृ.बा.स., दिपक वानखडे अध्यक्ष वि.का.सो.,ज्येष्ठ शिवसैनिक पुनम पटेल ,यादव पवार तालुका प्रमुख, राहूल देशपांडे शहर प्रमुख, अजिंक्य मात्रे माजी उपाध्यक्ष न.प.,माजी नगरसेवक रुस्तमभाई पप्पूवाले,केतन रत्नपारखी, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रज्योत अरगडे, युवासेना तालुका प्रमुख शे.अक्रम , शहर प्रमुख हर्षील शाह , कृ.बा.स. खरेदी विक्री संघ,वि.का.सो.तथा जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक, किशोर आडे, रमजान पटेल, इमरान खान,जहिरभाई, लोकेश शुक्ला, पंडीत सोयाम, शेखर चांदेकर, पंजाबराव पुसांडे, कैलास वाकोडे,राम नरळे रोशनभाई, पुरुषोत्तम कुडवे, आनंद आडे, तुळशीराम राठोड,अन्वर घोंगडे, सचिन ठाकरे,शे.गफ्फार, रिजवान पप्पुवाले शिवसेना सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, शिवसैनिक तथा शेतकरी व पुरग्रस्त बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 1
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे