You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

वांगी भराडी मध्यम प्रकल्प त्वरित पुर्ण करा

अन्यथा विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार भराडी सर्कल मधिल सर्व मतदारांचा निर्धार

जो उमेदवार वांगी भराडी मध्यम प्रकल्प मार्गी लावेल त्याच उमेद्वाराला येणा-या विधान सभा निवडणूकीत निवडून देण्याचा निर्धार भराडी सर्कल मधिल मतदार करण्याच्या तयारीत आहे..

सन 2000 साली प्रशासकीय मान्यता मिळालेल्या वांगी-भराडी लघुसिंचन प्रकल्प 19 वर्षांपासुन रखडला आहे.
2005 साली योजनेच्या सांडवा, खदाणी, धरणपीठासाठी मौजे कुतुबपुर, सिसारखेडा, वांगी बुद्रुक व भराडी या गावांच्या शिवारातील 97.80हेक्टर एवढ्या क्षेत्राची भुसंपादन प्रकियेसाठी अधिसूचना काढण्यात येऊन संयुक्त मोजणी करण्यात येऊन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.
बुडीत क्षेत्रातील गावांची संमती 
प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांनी विनाअट समंती दर्शवली असुन यासंबधीचे एकमुखी ठराव धानोरा, वांजोळा, सिसारखेडा, भराडी या ग्रामपंचायतींनी सादर केले आहे.

पन्नास ते साठ गावांचा विकास खुंटला
        हा प्रकल्प रखडला असल्याने परिसरातील पन्नास ते साठ गावांचा विकास खुंटला आहे. परीसरात सिंचनाची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध नसल्याने हजारो शेतक-यांना या वर्षीच्या अपवाद वगळता दुष्काळाच्या भयंकर झळा सोसाव्या लागत आहे. राज्य शासनाच्या दुर्लक्ष व स्थानिक राजकिय पाठ पुराव्या अभावी हा प्रकल्प रखडला आहे.

सिल्लोड शहर व तालुक्यातील अनेक गावांची सोय होणार 
  हा प्रकल्प पुर्ण झाल्यास सिल्लोड शहरासह तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. सद्या सिल्लोड शहर व भराडी गावाला पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पातुन पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पापासुन सिल्लोड शहर जवळच असल्याने भविष्यात 
अतिरिक्त वाढीव पाणीपुरवठ्यास नक्कीच मदत मिळणार आहे. 

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close