You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

चोरद येथे पतिने केला पत्नीचा खुन;आरोपी पतिस पोलिसांनी केली अटक

नवनाथ गुठे/ चोरद..

दिनांक..२९/०९/२०१९.

प्रतिनीधी……….

चोरद येथील रहिवासी विठ्ठल किसन झ्याटे याने (४५)शनिवारी (ता.28) रात्री 1 वाजता स्वतःच्या पत्नीला शोभा विठ्ठल झ्याटे (४०)हिला झोपेत कुर्हाडीने ठार केले. आरोपी झ्याटे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. म्रुतक शोभा झ्याटे यांच्या पश्चात 1 मुलगा व 2 मुली असुन आईच्या म्रुतुने मुल पोरके झाले. असुन आरोपी हा पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी येडशी जवळील एका शेताजवळ अटक करण्यात आली आहे. म्रुतक शोभा झ्याटे ह्या आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज मजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करित असे.आरोपी पती विठ्ठल किसन झ्याटे याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे त्यांच्या परिवारात दररोज किरकोळ कारणांमुळे वाद होणे हि नित्याचीच बाब झाली होती. परंतु काल रात्रीचे भांडण हे शोभासाठी अखेरचे भांडण झाले. शोभा ही झोपेत असताना पतिने कुर्हाडीने गळ्यावर मानेवर, सपासप वार केले यामध्ये शोभा जागिच मयत झाली. तर मुलाला जाग आली असता तो मध्यस्ती गेला असता त्याला सुध्दा कुर्हाडीचे घाव लागलेले आहेत. शोभा चा एकाएकी खुन झाल्याने चोरद यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. व पुढील तपास व कारवाई पोलीस करित आहेत.

याच घरात शोभाचा खुन झाला आहे
Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close