You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

केळातून विषबाधा; बहिनीचा मृत्यू तर भावावर उपचार सुरू

प्रतिनिधी / कामरगाव

केळातून विषबाधा झाल्याने एका २0 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी कारंजा तालुक्यातील मोहगव्हान येथे घडली. तर भावावर कारंजा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील मोहगव्हान येथील जगन्नाथ अघम यांची मुलगी कांचन व मुलगा अभिषेक यांनी २६ सप्टेंबरच्या रात्री केळाचे सेवन केले. २७ सप्टेंबरच्या सकाळी त्या दोघांनाही त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनी मुलगी कांचन व मुलगा अभिषेक यांना उपचाराकरिता कारंजा येथे आणले. परंतु, कांचनची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार तीला अमरावती येथील इरवीन हॉस्पीटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. परंतु , तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. तर मुलगा अभिषेक याच्यावर कारंजा येथील डॉ अजय कांत यांच्या कांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉ. कांत यांनी दिली आहे. सध्य परिस्थितीत अभिषेकवर डॉ कांत उपचार करीत असून, तो २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. त्याच्या लक्षणातून त्याला विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. अलिकडे फळे पिकविण्यासाठी केमिकल्सचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येतो. या वापरादरम्यान केमिकल्सचे प्रमाण कमी अधिक झाल्यास ते जीवावर बेतु शकते. तरीही व्यापार्‍यांकडून फळे पिकविण्यासाठी केमिकल्सचा सर्रास वापर केल्या जातो. परंतु, त्यावर नियंत्रण ठेवणाऽया अन्न व औषध प्रशासन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने फळे खाणे अनेकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कांचनप्रमाणे फळे खाण्याचा आणखी एखादा बळी ठरू नये यासाठी यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close