ब्रेकिंग

चोरद येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0 0 6 5 0 0
[wonderplugin_carousel id="1"]

अनंता घुगे/चोरद/दिनांक 15/08/2023/मंगरुळपीर तालुका प्रतिनिधि
मंगरुळपीर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरद येथे 76 वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
*मेरी माटी मेरा देश” या तीन दिवसीय कार्यक्रमात दररोज ध्वजारोहण करण्यात आले. दरवर्षप्रमाणेच ध्वजवंदन करून कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम गावातिल मुख्य मार्गावरुन प्रभात फेरी काढण्यात आली घोषवाक्य, नारे देऊन संपूर्ण गावांमध्ये विद्यार्थ्यांनी जयघोष केला तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य गण, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील , तंटामुक्ती समिती अध्यक्ष तसेच सर्व गावकरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.शिक्षक,तथा उपस्थित मानयवरांच्या हस्ते जोर पुरुषांच्या परतिमेचे पुजन करण्यात आले
या कार्यक्रमाचे ध्वजावंदन,व ध्वजाचे पुजन हे शाळेचे मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक श्री दत्तात्रय लकडे सर यांच्या हस्ते करण्यात आले,त्यानंतर स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारे भाषण श्री प्रवीण उघडे सर, यांनी केले. श्री वामनराव जाधव सर,यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. खाऊ वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली .
मध्यंतरी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ रूपालीताई काळे, यांचे कडून सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक पेन पेन्सिल खोड रबर आणि शॉपनर आधी वस्तू देऊन विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले.त्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले,कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य गण रमेश वसंता पवार, भागवत काळे, पोलीस पाटील उमेश वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद आंधळे,तथा गावातील सर्व नागरिक पुरुष महिला उपस्थित होत्या उपसरपंच, अंगणवाडी सेविका..मदतनीस. ग्रा. प. सदस्य आधी सर्व उपस्थित होते एकंदरीत सर्व कार्यक्रम शांततेत आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

1/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 5 0 0
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे