You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

चोरद येथील विद्युत रोहित्राचे तिन तेरा ;लाईनचा अक्षरशः खोळंबा

नवनाथ गुठे/ चोरद..

प्रतिनीधी…चोरद

येथे किन्हीराजाच्या ३३ के.व्ही ऊपकेंद्रावरुन मागील अनेक वर्षापासुन लाईनचा पुरवठा करण्यात येत आहे. येथे मात्र लाईनच्या समस्या बाबतीत चोरद येथील नागरिकांना शेलुबाजार येथील कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयात संपर्क करावा लागतो. तर येथील लाईनची समस्या अत्यंत बिकट झाल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.परिणामी मागील एकामहीण्यापासुन लाईनची समस्या जाणवत असून यामुळे विद्यार्थी, गरोदरस्त्रीया,रूग्ण, वयोवृद्ध, व लहानमुलांना याबाबतीत कमालीचा त्रास होत आहे. परिणामी चोरद येथील विद्युत रोहित्राचे तिन तेरा झाल्याने सर्व बाबतीत लाईनचा मात्र अक्षरशः खोळंबा झाला आहे. तसे पाहता गावामध्ये ज्या विद्युत रोहित्रावरुन लाईनचा गावामध्ये पुरवठा करण्यात येतो तो अत्यंत धोकादायक आहे. व गावात तिन मेन तारापैकी दोनच तारामधुन विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामधील एक तार डीम स्वरूपाचा असल्यामुळे गावातील सर्व नागरिक राहीलेल्या एकाच ताराचा उपयोग करतात त्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी डिम स्वरूपाची लाईन मिळत आहे.यामुळे गावातील नागरिकांना याचा फटका बसत असुन विद्यार्थ्यांचे भविष्य लाईट अभावी धोक्यात आले आहे. अंधारात दिव्याच्या ऊजेडात अभ्यास करतांना अनेक अडचणी येतात व तसेच पावसाळ्यात लाईनची समस्या निर्माण झाल्याने व चोरद येथे लाईनमन नसल्याने गावावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.हि सर्व समस्या गंभीर असुन लाईटबिल मात्र अव्वाच्या सव्वा येतो लाईन डिम स्वरूपाची बिल मात्र फुल स्वरूपाचे महावितरणला यावर काहीदेने घेणे नसुन फक्त आणि फक्त बिलाच्या वसुलीपुरतेच मर्यादीत आहेत. ऐवढे मात्र नक्कीच हि सर्व बाब अत्यंत गंभीर असुन वरिष्ठांनी याकडे जातिने लक्ष देऊन चोरद येथील लाईनची समस्या निकाली काढावी अशी मागणी जोर धरत आहे. आताच थोडावेळा पुर्वी किन्हीराजा येथील सबस्टेशनला फोन केला असता तेंव्हा चोरद येथील लाईन आमच्या कडुन सुरू आहे तुम्ही तुमच्या लाईनमशी संपर्क साधावा याबाबतीत शेलुबाजार येथील कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणतात सद्यातरीचोरद साठी लाईनम नसुन दुसरा व्यक्ती देण्यात येईल आपणास ईतर समेस्येबाबतीत आपण डि.वाय.ई.मं.पीर यांच्याशी संपर्क करावा. असे सांगितले आहे.मनुष्यबळ संख्या कमी प्रमाणात आहे. पर्यायी व्यवस्था म्हणुन आपणास तात्पुरता लाईनमन देण्यात येईल. परंतु पावसाळ्यात लाईनची समस्या निर्माण झाल्याणे चोरद येथे विवीध प्रकारच्या आजारात वाढ झाली आहे.यावर महावितरणने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close