शिरपूर ग्रा.प.मध्ये अग्निविरांचा सत्कार
शिरपूर :
भारत सरकारच्या सैन्य विभागा मार्फत मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या अग्निवीर पदाच्या पात्रते करिता लागणाऱ्या सर्व परीक्षा कठोर परिश्रम करून अग्निवीर जवान म्हणून नियुक्ती मिळालेल्या कृष्णा देशमुख, श्रीराम वाढे आणि अभिषेक इंगळे हे नुकतेच आपले सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून काही दिवसांच्या सुट्टी मध्ये आपल्या गावी शिरपूर जैन येथे आले असता शिरपूर ग्रा.प.च्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
समस्त गावकऱ्या समोर ग्रा.प.कडून झालेला हा सत्कार व गावकऱ्यांकडून मिळालेले प्रेम पाहून सेनादलाचे तीनही जवान भारावून गेले असून गावातील इतरही तरुणांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य व प्रामाणिक पणा ठेवून यशाचे शिखर गाठावे अशी प्रतिक्रिया यावेळी ACTIVE NEWS सोबत बोलतांना दिली. शिरपूर मधून या तीनही जवानांवर सर्वच स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्रा.प.मध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाम दिक्षित यांनी केले.