You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

1111 फुटांच्या भव्य तिरंग्याने अभाविपची भारत मातेला सलामी युवकांनी राष्ट्रभक्ती जागृती ठेवावी :-स्वप्नील बेगडे

प्रतिनिधि :- तनवीर बागवान

कुंभारपिंपळगाव प्रतिनिधी शहरात अखिल भारतीय विद्यार्थि परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त दि 16 सप्टेंबर रोजी सोमवारी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. सरस्वती भुवन प्रशालेत प्रदेश मंत्री व शालेय समितीचे अध्यक्ष अंशीरामजिजा कंटुले यांच्या हस्ते पदयात्रेचे उदघाटन झाले. ही पदयात्रा अंबड -पाथरी टी पॉईंट, मेन रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा पदयात्रेची सांगता झाली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रदेश मंत्र्याच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेश मंत्री म्हणाले विद्यार्थ्यांनी आपली राष्ट्रभक्ती -देशभक्ती सतत जागृती ठेवावी. या वयात झालेले संस्कार विद्यार्थ्यांमधे कायमस्वरूपी राहतात आणि म्हणुन या वयात चांगले आणि देशभक्तीचे संस्कार होणं गरजेचं आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता कासट स्वागत गीत अपर्णा आर्दड, रोहिणी कंटुले आणि राजश्री भालशंकर हिने आणि परिषद गीत किशोर मोरे यांनी घेतले. प्रास्ताविक जिल्हा संयोजक विक्रम राऊत आणि आभार प्रदर्शन प्रा. नाना गोडबोले यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नारे देत तिरंगा घेऊन देशप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी अभाविपचे आसाराम राऊत, प्रसिद्धी प्रमुख किशोर मोरे, पदयात्रा प्रमुख शरद चापाकानडे, आकाश चापाकानडे, मारोती कल्याणकर, आकाश मोरे, अशोक काळे, संजय नाईक, दीपक आर्दड, वेदांत खैरे, समाधान कुबेर, अनिकेत शेळके, रामदास बरसाले, दत्ता काळे, अविष्कार इंगळे, शर्मिष्ठा कुलकर्णी तसेच बजरंग दल, ग्रामविकास युवा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स. भू. प्रशाला, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुल, व्यापारी महासंघ व हजारो देशभक्त नागरिकांचा या पदयात्रेत सहभाग होता

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close