You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

शिवसेनेच्या ‘ प्रथम ती’ महिला संमेलनास उदंड प्रतिसाद

महिलांच्या संरक्षण आणि सबलीकरणा साठी शिवसेना आपल्या पाठीशी - प्रियंका चतुर्वेदी

शिवसेना तुमच्या पाठीशी ; महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येणे आवश्यक – प्रियंका चतुर्वेदी

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महिलांचा पुढाकार असणे गरजेचे – प्रियंका चतुर्वेदी

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि. 10, आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगात कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. असा उपदेश हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे. यापासून प्रेरणा घेऊन महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांचे संरक्षण व सबलीकरण होवून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील आधुनिक नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी महिलांचा मोलाचा सहभाग असावा यासाठी ‘ प्रथम ती ‘ या महिला संमेलनातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील पहिले संमेलन हे सिल्लोड येथे होत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या तसेच संमेलनाचे मुख्य प्रवर्तक प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

मंगळवार ( दि.10 ) रोजी शहरातील नर्मदाबाई मंगल येथे शिवसेना राज्य महिला आघाडीच्या वतीने युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘ प्रथम ती ‘ या महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेच्या उपविभाग संघटक दीपा पाटील, मुंबईच्या प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी, मुंबईच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर , माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना चतुर्वेदी म्हणाल्या की , हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर शिवसेनेने नेहमी महिला सबलीकरण व सक्षमीकरणावर विशेष लक्ष दिलेले आहेत. ग्रामीण भागातील महिलांनी उच्च शिक्षणासाठी प्राधान्य दिले पाहिजे. महिला जर उच्च शिक्षणात पुढे असेल तर आपण खऱ्या अर्थाने सक्षम होवू असे स्पष्ठ करीत शिवसेना आपल्या सोबत खंबीरपणे उभी आहे आता महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये असे आवाहन प्रियंका चतुर्वेदी यांनी यावेळी केले. संमेलनाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. संमेलनाच्या पहिल्या सत्रात शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांचा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालूका प्रमुख किशोर अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात इतिहास काळात व त्यांनतर वर्तमानात शिवसेनेने महिलांना प्रथम स्थान दिले असल्याचे मार्गदर्शनातून स्पष्ट करण्यात आले.

आज देशामध्ये रोज प्रत्येक राज्यात तसेच राजधानी दिल्लीत सुद्धा महिलांवर होणाऱ्या अत्याचार माध्यमातून पहायला मिळतो. मात्र आज शिवसेने मुळेच महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे नाममात्र किंवा इतर राज्याच्या तुलनेत कमी असून देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगातील सर्वात व्यस्त शहर जेथे शिवसेने मुळेच महिला सुरक्षित आहेत असे प्रतिपादन तेजस्वी घोसाळकर यांनी या प्रसंगी केले.
तर कामिनी शेवाळे यांनी शिवसेनेने त्यांच्या सत्ताकाळात मुंबई सारख्या ठिकाणी महिला सबलीकरणासाठी वडापाव, झुणकाभाकर सारखे उपक्रम राबविले.
1985 साली राज्यात दुष्काळ पडला होता अशा वेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने रेशन मधील धान्याचा भरमसाठ भाव वाढविला होता. काँग्रेस सरकारच्या या धोरणाच्या विरोधात महिला शिवसैनिकांनी भगव्या साड्या परिधान करून आंदोलन उभारले होते. त्यांनतर सरकार ने धान्याचा भाव स्थिर केले होते हे कोणीही विसरू शकणार नाही असे दीपा पाटील म्हणाल्या.
संध्या दोशी यांनी मार्गदर्शन करतांना माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजकांनी एका दिवसात नियोजनबद्ध संमेलन यशस्वी केल्या बद्दल प्रशंसा करीत संमेलनास महिलांमध्ये मुस्लिम महिलांची उपस्थिती पाहून हा शिवसेनेचा विश्वास असल्याचे स्पष्ठ केले.

संमेलनाचे सूत्र संचलन दीपाली भवर यांनी केले. नगराध्यक्षा राजश्री निकम यांनी प्रास्ताविक तर दुर्गाबाई पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

संमेलनस शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रेखाताई वैष्णव, जिल्हा परिषद सदस्या सीमा गव्हाणे, मीना गायकवाड, मंगलाताई तायडे, पंचायत समितीच्या माजी सभापती रेखा जगताप, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, कल्याणी गौर, सविता झंवर, शबाना बेगम शेख बाबर, कडूबाई सपकाळ, हिराबाई क्षीरसागर,मालती डोभाळ, डॉ. कुंती झलवार,दीपाली बेंडाळे , फरकाडे ताई, मेघ शाह , अर्चना पवार, विद्या गव्हाणे आदींसह तालुक्यातील महिला लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व महिलांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close