You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

विघ्नहर्ता गणेश मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम; रक्तदान व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

मालेगाव:- विविध सामाजिक उपक्रम घेणारे मंडळ अशा नावाने प्रसिद्ध असणारे मालेगाव शहरातील विघ्नहर्ता गणेश मंडळ व इतर गणेश मंडळ यांच्या सहकार्याने मालेगावात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रविवार दि 8 सप्टेंबर रोजी शिव चौक येथील जैस्वाल कॉम्प्लेस मध्ये आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये 114 जणांनी आपले रक्त दान दिले त्यावेळी उद्घघाटक म्हणून मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनोने वाशिम जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिताबदी साहेब छत्रपती सेना अध्यक्ष करण साहू आदींची मुख्य उपस्थिती होती त्यावेळी विघ्नहर्ता गणेश मंडळ जनता गणेश मंडळ नवरंग गणेश मंडळ व श्रीकृष्ण गणेश मंडळ या चारही गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यावेळेस 114 जणांनी आपले रक्तदान दिले रक्तदान शिबिराला कांदा देवी डाळे रक्त पेढी च्या डॉक्टर नि सहकार्य केले.
तसेच गरीब असलेल्या 250 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त लोकांना 21000 ची मदत सुद्धा केली आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close