You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

बचतगटांच्या ८०० महिलांना गायींचे थाटात वितरण

ना. पंकजाताई मुंडेंनी दिवाळीपूर्वीच परळीतील शेकडो भगिनींना दिली 'ओवाळणी'

मला नांवापेक्षा सर्वसामान्यांचा आशीर्वाद कमवायचायं – ना. पंकजाताई मुंडे

‘घरात आई, गोठ्यात गाई, मनात आमच्या मात्र पंकजाताई’- लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या भावना

प्रतिनिधि:- तनवीर बागवान प्रतिनिधि जालना

परळी दि. ०८ ——- माझा प्रत्येक क्षण गरीब, वंचित आणि पिडित घटकांच्या कामाला यावा, यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे. माझ्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत, त्यामुळे कुणी कितीही आरोप करा, मी समाजाची सेवा करतच राहील. मला नांव कमविण्यापेक्षा सर्व सामान्य माणसाचा आशीर्वाद कमवायचायं अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी महिलांना साद घातली. दरम्यान, परळी मतदारसंघातील बचतगटांच्या ८०० भगिनींना आज त्यांनी दिवाळीपूर्वीच शासनामार्फत गाय वाटप करून ‘ओवाळणी’ दिली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त सहकार्याने परळी मतदारसंघातील बचतगटांच्या महिलांना ८०० गायींचे वाटप आज नटराज रंगमंदिरात मोठ्या उत्साहात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले, जि.प. अध्यक्ष सविता गोल्हार, परभणी पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ नितीन मार्कंडेय, डाॅ. शैलेश मदने, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महिला आर्थिक विकास मंडळाच्या सदस्या उमाताई समशेट्टे, रत्नमाला घुगे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, महिलांना आम्ही घरपोच गाय दिली आहे, दिवाळीत भावाची जशी ओवाळणी असते तशी माझ्या शेकडो बहिणींची काळजी म्हणून मी ही भेट आणली आहे. यासाठी कुणाला एक रूपयाही द्यावा लागला नाही, की कुणाकडून आम्ही एक पैसाही घेतला नाही, सर्वांना मोफत गायी वाटप केल्या, यातून माझ्या भगिनी दूधाचा व्यवसाय करून कुटूंबाचा आर्थिक कणा बनतील. मी ज्यावेळी पहिल्यांदा मंत्री झाले त्यावेळी ५६ हजार बचतगट होते, आता याची संख्या चार लाखांवर गेली आहे. ही चळवळ गतीमान करून महिलांना सशक्त केले असल्याचे त्या म्हणाल्या. एकीकडे दुष्काळात शेतकरी आत्महत्या होत असतांना दुसरीकडे मात्र बचतगटांच्या महिलांनी आपल्या व्यवसायातून घराला सावरले, त्यांची हीच ताकद मला मोठी वाटते.ज्या समाजात नीर (पाणी) आणि नारी (स्त्री) सुरक्षित आहे तो समाज सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या शाबासकीने ताकद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच महिला मेळावा झाला, मेळाव्याला माझ्या भगिनी मोठ्या संख्येने आल्या होत्या. ही जबाबदारी तुमच्या सहकार्यामुळेच मी चांगल्या प्रकारे पार पाडू शकले. राजकारणात मला खूप संघर्षाला सामोरे जावे लागले, यात कोणाचा आधार नसल्यासारखे वाटत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ बहन पंकजा ‘ असा उल्लेख करत जी शाबासकी दिली, त्याने मला खूप मोठे प्रोत्साहन मिळाले, ताकद मिळाली आणि भविष्यात काम करण्याचा उत्साह वाढला असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

दुधाळ जनावरांच्या पायलट प्रोजेक्टसाठी बीडची निवड – जानकर

यावेळी बोलतांना पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी पशूसंवर्धन विभागाने दूधाळ जनावरे वाटपासाठी पायलट प्रोजेक्ट आखला असून त्यासाठी बीड जिल्हयाची निवड केली असल्याचे सांगितले. ना.पंकजाताई मुंडे यांच्या सूचनांमुळेच या गायी आम्ही महिला बचतगटांना दिल्या आहेत. गायी बरोबरच आता शेळ्या मेंढ्या देण्याचा देखील माझा विचार आहे. पंकजाताई मंत्री झाल्यापासून राज्यात बचतगटांचे काम वाढले, असे काम करणारा मंत्री मी कधीच पाहिला नाही, त्यामुळे त्यांचे नेतृत्व सक्षम करा, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे ते म्हणाले.

मनात मात्र पंकजाताई- लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या भावना

‘घरात आई, गोठ्यात गाई आणि मनात आमच्या मात्र पंकजाताई’ अशा शब्दांत लाभार्थी महिला कांता मुंडे (पांगरी) व स्वाती गिते (तळणी) यांनी आपल्या भावना मनोगतात व्यक्त केल्या. बचतगटांचे काम करत असल्याने मी धाडसी झाले, मला ताकद मिळाली. मी सेंद्रीय शेतीही करते. मला वाटते माझ्यात पंकजाताईच अवतरली आहे, त्यांनी गाय देऊन मोठा आधार दिला असे कांताबाई म्हणाल्या तर पंकजाताई आमच्यासाठी देव आहेत, माझं शिक्षण नव्हत, मला आधार नव्हता. आई वडिलांनी जे केलं नाही ते ताईनी केलं अशा शब्दांत स्वाती यांनी मनोगत व्यक्त केले. या मनोगताने उपस्थित महिला भारावून गेल्या.

कार्यक्रमाच्या सुरवातीला ना पंकजाताई मुंडे यांनी बचतगटांच्या महिलांना वाटप करण्यात येणा-या गो-मातेचे पूजन केले, त्यानंतर सर्व महिला लाभार्थ्यांना गायीचे लाटप करण्यात आले.यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने अवर्षणग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या गटास मासळी विक्रीसाठी फिरते वाहन त्यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close