You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

वान प्रकल्पावरून अकोला शहराला दिलेले आरक्षण आदेशला मुख्यमंत्री यांनी दिली स्थगिती

आमदार प्रकाश भारसकलेयांच्या मागणीला यश

प्रतिनिधी-:निलेशबहाळ.अकोट

अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पावरून अकोला शहराला वाढीव पाणी पुरवठ्यासाठी २४ द.ल.ध.मी पाण्यास शासनाने आरक्षण मंजुर केले आहे. वान प्रकल्पाच्या पाणी आरक्षणावरून स्थानिक शेतकऱ्यांनी वाद निर्माण करून जनक्षोभ निर्माण केलाआहे. शासनाने पाणी आरक्षण देतांना सिंचनाचा विचार केला नाही पिण्याच्या पाण्याला प्राधान्य लक्षात घेता पाणी आरक्षण दिले असले तरी सिंचनात होणारी कपात हा मुद्दा समोर करून शेतकऱ्यांनी शासना प्रती मोठा रोष व्यक्त केला होता. अकोट विधान सभा मतदार संघाचे भाजपा जेष्ठ नेते प्रकाश भारसाकळे हे आमदार असून सिंचनाचा हक्क हीरावुन घेतल्या जाणार नाही ,त्यांनी शासनाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांचे गैरसमज मात्र कायम आहे. सिंचानामध्ये आरक्षणामुळे बाधा येईल हा असा शेतकऱ्यांचा संभ्रम असल्याने तो दूर करण्यासठी तसेच सिंचानामध्ये कपात होईल व शेतकरी सिंचनापासून वंचित होणार नाही अशी भावना आ. भारसाकळे यांची असल्याने हा संभ्रम दूर करण्यासाठी तसेच सिंचनापासून शेतकरी वंचित राहू नये या साठी आ. भारसाकळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे सोबत चर्चा करून सदर पाणी आरक्षण आदेशाला तातडीने स्थगिती द्यावी या करिता विनंती केली आहे. पक्षाचे व सभागृहाचे जेष्ठ व अभ्यासू व्यक्तिमत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सदर पाणी आरक्षण आदेशाला स्थगिती दिली आहे

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close