You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

मालेगाव येथे श्री १००८ ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर येथे पर्युषण पर्व निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

पवित्र पर्युषण पर्व ( दशलक्षण ) यानिमित्ताने गुरुवार पासून दररोज सकाळी ६ त रात्री ८ वाजेपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत . यानुषंगाने ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दशलक्षण धर्मावरील धार्मिक प्रवचन देताना परमपूज्य पंडित धीरज पाटील यांनी उपस्थितांना सांगितले की ,

मानवी जीवनात उत्तम मार्दव अंगिकारलेल्याने मानपान अहंकार नष्ट होऊन मनुष्य आपली खरी विनम्रता दाखवन सुखी जीवन जगण्याच्या मार्गावर येतो.जोपर्यंत आपण फक्त आपल्या पुरता विचार करतो तेव्हा अहंकार आपल्या सोबतच राहतो. मात्र मार्दव धर्म अंगिकारल्याने अहंकार नष्ट होऊन आपल्या मानवी जीवनातील आपल्या मनाचे मोठेपणा दिसून येत असल्याचे प.पु.पंडित धीरज पाटील यांनी सांगितले श्रेष्ठ लोक कधीच मानपान बघत नाहीत उगीच

मोठेपणा दिल्याने मनुष्य मोठा होत नाही तर तो त्याच्या कर्तुत्व आणि कार्याने मोठा होतो . पर्युषण पर्व सुरू झाल्याने शहरातील धार्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे . यामुळे सर्व दिगंबर जैन बांधावामध्ये उत्सवाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . दरम्यान , या पयुषण पर्वात ( दशलक्षण ) समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री १००८ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट समिती च्या वतीने करण्यात आले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close